Vijayrao Varpudkar sarkarnama
मराठवाडा

काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्यांचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

परभणी : परभणीचे काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचे बंधू भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. विजयराव वरपूडकर (Vijayrao Varpudkar) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विजयराव वरपूडकर परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

परभणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर वरपूडकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत परभणीचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज (ता. १२ ऑक्टोबर) दुपारी हा पक्षप्रवेश होणार आहे.

अगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपने जोर लावला आहे. या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर भाजपचा डोळा आहे. त्यामुळेच ईतर पक्षातील नेत्यांना भाजप गळाला लावत आहे. दरम्यान, नांदेडमध्येही भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना देगलूर-बिलोली मतदार संघासाठी उमेदवारी दिली आहे. साबणे यांना उमेदवारी जाहिर करत भाजपने मराठवाड्यात शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्याच बरोबर आता वरपूरडकर यांच्या माध्यमातून काँग्रेसलाही लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT