Nana Patole Phulambri Constituency Sarkarnama
मराठवाडा

Phulambri Assembly Constituency : देवगिरी कारखाना सरकारच्या तिजोरीतून कर्जमुक्त करणार!

Congress State President Nana Patole criticizes Prime Minister Modi : देशामध्ये मोदी हे `बटेंगे तो कटेंगे`च्या बाता करतात. मात्र, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीच बोलत नाहीत. एवढा दुर्बल पंतप्रधान आतापर्यंत देशाने पाहिला नाही.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना हा सरकारच्या तिजोरीतून पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमुक्त करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील वडोद बाजार येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ प्रचारसभेत ते बोलत होते.

भाजपने आयात केलेला उमेदवार दिलेला आहे. एवढी वर्षे सत्तेत असूनही त्यांना उमेदवार मिळाला नाही. (Nana Patole) राज्यातील शिंदे-फडणवीस-पवारांचे सरकार भ्रष्टाचारी असल्याची टीका करत भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची सत्ता गेल्यापासून दानवेंचा जळफळाट झाला आहे. मात्र, कल्याण काळे यांच्या रूपाने तुम्ही एक चांगला माणूस लोकसभेत पाठवला. आता विलास औताडे यांनाही विधानसभेत पाठवा, असे आवाहन पटोले यांनी केले.

देशामध्ये मोदी हे `बटेंगे तो कटेंगे`च्या बाता करतात. मात्र, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीच बोलत नाहीत. एवढा दुर्बल पंतप्रधान आतापर्यंत देशाने पाहिला नाही. (Kalyan Kale) महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असेल, असा दावाही पटोले यांनी आपल्या भाषणात केला. आतापर्यंत दहा वर्षे भाजपची राज्यात आणि केंद्रात सत्ता होती. मग आतापर्यंत देवगिरी कारखाना का सुरू केला नाही.

`राजे संभाजी` आणि `रामेश्वर` साखर कारखाना सुरू ठेवण्यासाठी या भागाच्या आमदार व खासदारांनी देवगिरी सहकारी साखर कारखान्याचा बळी दिल्याचा आरोप खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली. बागडे अन् दानवेंनी कारखाना सुरू करण्याचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर न्यायालयात द्यावे, अन्यथा महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना निवडून आणा, आम्ही हमीपत्र न्यायालयात देतो, असे काळे म्हणाले.

जनतेने मला संधी द्यावी, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा नक्कीच कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी, कष्टकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी मतदारसंघात प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT