Phulambri Assembly Constituency: देवगिरी साखर कारखाना सुरू करणार सांगणाऱ्यांनी शपथ पत्र लिहून द्यावे

Devgiri Sugar Factory: विहिरीचे प्रकरण मंजूर करायला पन्नास हजार रुपये द्यावे लागतात, घरकुल मंजूर करायला वीस हजार रुपये द्यावे लागतात, तेव्हा लोकांच्या भावना काय असतील.
Vilas Autade
Vilas AutadeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या फुलंब्री मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खासदार डाॅ.कल्याण काळे यांनी महायुतीला आव्हान दिले आहे. तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करणार अस सांगणाऱ्यांनी तसे शपथ पत्र लिहून द्यावे, नाहीतर मी देतो, अशा शब्दात टीका त्यांनी केली आहे.

फुलंब्री मतदरासंघातील गावभेटी, काॅर्नर बैठका आणि संवादातून काँग्रसेचे उमेदवार विलास औताडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. (Congress) मतदारसंघातील गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळापासून बंद पडलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूने प्रचाराचा मुद्दा केला जातोय. महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी आपण हा कारखान सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

त्यांच्या या विधानावर काँग्रेस महाविकास आघाडीचे विलास औताडे यांच्या प्रचार सभेत खासदार कल्याण काळे यांनी टीका करतांना महायुतीचे भ्रष्ट सरकार कारखाना सुरू करणार असेल तर तसे त्यांनी शपथ पत्र लिहून द्यावे, नाहीतर मी लिहून देतो, की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच हा कारखाना सुरू करणार, असे म्हणत विरोधकांना आव्हान दिले.

Vilas Autade
Congress Politics : निवडणूक आयोगाने रश्मी शुक्लांना हटवले, तरी काँग्रेसचा सरकारच्या 'त्या' शब्दावर आक्षेप

औताडे यांच्या प्रचारार्थ पळशी पंचायत समिती गणातील महाविकास आघाडीतील मतदारांसोबत बैठक घेण्यात आली. जेव्हा सरकारी कामात काही अडचणी येतात आणि शेतकऱ्याला त्या अडचणींना तोंड द्यावे लागते, विहिरीचे प्रकरण मंजूर करायला पन्नास हजार रुपये द्यावे लागतात, घरकुल मंजूर करायला वीस हजार रुपये द्यावे लागतात, तेव्हा लोकांच्या भावना काय असतील.

ही परिस्थिती बदलून जर तुम्हाला हे सर्व बदल घडवून आणायचे असतील तर आपल्या जवळचा, गावातला माणूस सत्तेत असला पाहिजे. (Kalyan Kale) कारण अडचण ही तुमची आमची नाही, अडचण ही गरीब शेतकऱ्याची असते. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी देवगिरी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची ग्वाही दिली आहे. खरच हे भ्रष्ट सरकार देवगिरी साखर कारखाना चालू करणार असेल तर तसे त्यांनी शपथ पत्र लिहून द्यावे, नाहीतर मी लिहून देतो की, महाविकास आघाडी सरकार आल्यावर देवगिरी साखर कारखाना पुन्हा चालू होणारच.

Vilas Autade
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचा आश्वासनांचा पाऊस; 'पंचसूत्री' जाहीर

भाजप सरकारने राज्यात जुमलेबाजी चालवली आहे. गेल्या दहा वर्षात आमच्या शेतकऱ्याला वेठीस धरले आहे, स्पर्धा परीक्षा वेळेवर नाही. तसेच महागाई, वाढते तेलाचे दर या विषयावरून काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

पांडुरंग तागडे, नाना पळसकर ,शंकरराव ठोंबरे, जगन्नाथ काळे, संजय बापू औताडे, जावेदभाई, मुन्नाभाई,मदन चौधरी,गजानन मते, अण्णा पाटील हरणे, जावेद पटेल,बाळासाहेब भोसले,गजानन मते,कल्याण पाटील उकिर्डे,संतोष कांजळे, बबनराव वाघ,सुभाष वाने तसेच शिवसेना व राष्ट्रवादी पक्षातील इतर पदाधिकारी आणि पळशी गावातील सरपंच व उपसरपंच आणि कार्यकर्ते यांची यावेळी उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com