मराठवाडा

Vilas Bhumre : शिवसेना आमदाराच्या मुलाचा हट्ट निवडणूक कर्मचाऱ्याच्या मुळावर; बोटाला लावलेली शाई अन् करू दिलेले मतदान अंगलट

विलास भुमरे यांनी मतदान केंद्रात मुलाला नेऊन बोटाला शाई लावली आणि मतदान केल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

Jagdish Pansare

ZP Election News : शिवसेनेचे पैठणचे आमदार विलास भुमरे यांच अतिउत्साह निवडणुक कर्मचाऱ्याच्या अंगाशी येणार आहे. पाचोड येथील मतदान केंद्रावर विलास भुमरे हे आपल्या मुलाला घेऊन आले होते. उत्सूकता म्हणून मतदान केंद्रापर्यंत येणे समजू शकतो, पण थेट मतदान केंद्रात प्रवेश बोटाला शाई आणि ईव्हीएम मशीनजवळ जाऊन बटन दाबणे हे अतिच झाले. हा प्रताप केला आहे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी केला आहे.

मतदान केंद्रात जाऊन बोटाला शाई अन् ईव्हीएमचे बटन दाबल्याचा भुमरे पिता-पुत्राचा हा प्रताप समाज माध्यमांवर आता धुमाकूळ घालतो आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी याची चौकशी करून मुलाच्या बोटाला शाई लावणाऱ्या आण त्याला ईव्हीएम मशीनपर्यंत जाऊ देणाऱ्या निवडणुक अधिकारी, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आमदार विलास भुमरे यांच्या उत्साहाचा फटका कर्मचाऱ्यांना बसणार आहे.

बरं या प्रकाराबद्दल ना विलास भुमरे यांना गम आहे, ना त्यांचे वडील खासदार संदीपान भुमरे यांना. संदीपान भुमरे यांनी मतदानाला कुटुंबासहच जात असतात. लहान मुलाकडून झाली असेल चुकी. पण मला याबाबतची काही माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो, एवढंच ते सांगत होते. विलास भुमरे यांनी मात्र या प्रकारावर अधिक बोलणे टाळले. लोकप्रतिनिधी जर असे वागू लागले, तर इतरांचे काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पाचोड येथील मतदान केंद्रावर विलास भुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी विलास भुमरे यांनी स्वतःच्या मुलालाही बोटाला शाई लावून घेतली. विलास भुमरेंचा मुलगा थेट मतदानाच्या मशीन जवळ गेल्याचं पाहायला मिळालं. त्यावर खासदार संदिपान भुमरे यांनी एक अजब प्रतिक्रिया दिली. लहान लेकरू आहे, मी तिथे नव्हतो, मला काही माहिती नाही, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT