Vilas Ghule Case  Sarkarnama
मराठवाडा

Vilas Ghule Case : विलास घुले हत्या प्रकरणातील साक्षीदार उमेश मानेला दीड महिन्यानंतर अटक!

Vilas Ghule Murder Case : दीड महिन्यांपासून फरार असणाऱ्या साक्षीदाराला पोलिसांनी अटक केली असून विलास घुले हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

Jagdish Pansare

Beed Vilas Ghule News : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात साक्षीदार असलेल्या उमेश मानेला अखेर अटक करण्यात आली आहे. विवाहित महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, तो फरार होता. अखेर या बलात्काराच्या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केली आहे. केज तालुक्यातील कदमवाडी येथील उमेश माने याच्याविरुद्ध एका विवाहित महिलेने जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती.

या तक्रारीवरून १४ जुलै रोजी केज पोलिस ठाण्यात उमेश माने याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो दीड महिन्यांपासून फरार होता. काल दुपारी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली. उमेश माने हा टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले हत्या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार आहे.

या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उमेश माने आणि आरोपींमधील वादाचीही चर्चा आहे. पीडित महिलेने उमेशने अत्याचाराचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केल्याचाही आरोप तक्रारीत केला आहे.

उमेश मानेच्या अटकेनंतर आता विलास घुले हत्या प्रकरणातील वादाचे नेमके मूळ कारण काय होते? हे देखील तपासात समोर येणार आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर आरोपींना पळून जाण्यासाठी गाडी पुरवत मदत केल्याचा आरोप आहे.

त्याच्या अटकेसाठी बीडमध्ये कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले. माने याच्या अटकेनंतर विलास घुले हत्या प्रकरणात खरंच सौरभ सोनवणे यांचा काही संबंध आहे का? हे देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT