Vilas Ghule Murder Case Sarkarnama
मराठवाडा

Vilas Ghule Murder Case : खासदार बजरंगबाप्पांच्या मुलाच्या अटकेसाठी दबाव वाढला : विलास घुले प्रकरणात बीडमध्ये आरपारचा लढा!

Vilas Ghule Murder Beed March :विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यासह अन्य दोघांची नावे समाविष्ट करून त्यांना अटक करण्याची मागणीसाठी मोर्चा काढण्यात येत आहे.

Jagdish Pansare

Beed News : केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासन कोणतीही ठोस दखल घेत नसल्याने आता या विरोधात २१ ऑगस्ट रोजी बीड शहरात विराट मोर्चा काढण्याचा एल्गार आंदोलकांनी पुकारला आहे.

​२१ जून रोजी विलास घुले यांची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यासह अन्य दोघांची नावे समाविष्ट करून त्यांना अटक करण्याची मागणी मृत विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असला, तरी अटकेच्या मागणीवर घुले कुटुंबीय ठाम आहेत.

रमेश घुलेंची प्रकृती खालावली

​गेल्या १२ दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे उपोषणकर्ते रमेश घुले यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. डॉक्टरांनी रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला असला, तरी त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी विष प्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

सोनवणेंचा ब्लॅकमेलिंगचा आरोप

​दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर खासदार बजरंग सोनवणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या मुलावर केवळ राजकीय द्वेषातून आरोप केले जात असून, हे नावाचा वापर करून केले जाणारे ब्लॅकमेलिंग आहे. आता मी शांत बसणार नसून, विनाकारण माझ्या मुलाचे नाव गोवणाऱ्यांना सोडणार नाही असा सणसणीत इशारा सोनवणे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT