

Beed News: बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणात गेल्या कित्येक दिवसांपासून गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या हत्या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपीला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी रमेश घुले आणि त्यांच्या कुटुंबियांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. पण स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहणासाठी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीडमध्ये येणार आहे. त्याच धर्तीवर विलास घुले हत्या प्रकरण पुन्हा एकदा तापलं.
केज तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्या कुटुंबियांनी आपला लढा आणखी तीव्र केला आहे. या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपींच्या अटकेची मागणी करत घुले कुटुंबानं आपला लढा आणखी तीव्र केला आहे. पालकमंत्री सुनेत्रा पवार या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी बीडमध्ये येत आहे. त्यांच्या दौर्यापूर्वीच विलास घुले यांच्या पत्नीनं विष प्राशन करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.
विलास घुले हत्या प्रकरणात संशयित मुख्य आरोपीला अटक करा, या मागणीसाठी रमेश घुले आणि त्यांच्या कुटुंबियांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. गेल्या दहा दिवसांपासून घुले कुटुंबियांकडून हे आंदोलन सुरू आहे.
याचदरम्यान, विलास यांचे बंधू रमेश घुले यांची प्रकृती बिघडल्याने बीडमधील राजकीय वातावरण तापलं आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे बीड दौऱ्यावर आले होते. त्याचदरम्यान, विलास घुले यांचे मेहुणे तानाजी घुले व अन्य एकजण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढले.
तानाजी घुले यांनी आरोपीच्या अटकेची मागणी करत गळ्यात दोरीने फास लावून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांचीही धावपळ सुरू झाली होती. आता विलास घुले यांच्या पत्नीनंही विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण लागण्याची शक्यता आहे.
विलास घुले यांच्या पत्नीला या प्रकारानंतर उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, या खळबळजनक घटनेनंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. या प्रकरणात आता वंजारी विरुद्ध मराठा असा वाद पेटण्याची बीड जिल्ह्यात पेटण्याची शक्यता आहे.
21 जून 2026 रोजी भांडण सोडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या विलास घुले यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मूळ वादाशी संबंधित मुख्य संशयित उमेश माने याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या कुटुंबीयांचा व भावाचा (रमेश घुले) आरोप आहे की, हत्येच्या कटामध्ये व सीडीआर (CDR) अहवालात स्पष्टपणे समोर आलेल्या नावांवर व खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर कारवाई व्हावी,अशी मागणी करण्यात येत आहे.
आरोपींना तात्काळ अटक न केल्यामुळे व तपासामध्ये दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून घुले कुटुंबीयांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून, या आंदोलनादरम्यान न्याय न मिळाल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या प्रकरणाचा वाढता रोष पाहता हा तपास एसआयटीकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांकडून इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.