Vilas Ghule Murder Case; Bajrang Sonawane son Sourabh Sonawane sarkarnama
मराठवाडा

Vilas Ghule Murder Case : खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची 4 तास चौकशी, घुले प्रकरणात 'त्या' अँगलवर पोलिसांचा फोकस

Bajrang Sonawane Saurabh Sonawane : नोटीस बजावल्यानंतर सौरव सोनवणे चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली.

Roshan More

Saurabh Sonawane News : विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. आज सौरव सोनवणे यांचा जबाब नोंदवण्यात आला. तब्बल चार तास त्यांची चौकशी सुरू होती. या प्रकरणी IPS व्यंकटरामन यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, 'या प्रकरणाचा तपास पूर्ण वेगाने सुरू आहे. पोलीस सर्व प्रकारचे डिजिटल पुरावे आणि तांत्रिक डेटा गोळा करत आहेत. मुख्य आरोपीला आधीच ताब्यात घेण्यात आले असून, तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले कपडे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.'

सौरव सोनवणे यांच्या चौकशीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले,'नोटीस बजावल्यानंतर सौरव सोनवणे चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान तपासाशी संबंधित आणि त्यांच्या बाजूने सांगण्यात आलेल्या सर्व लिंक्स आणि मुद्द्यांबाबत सविस्तर प्रश्न विचारून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.'

'त्या' गाडीवर फोकस

तपासात एका 'थार' गाडीचा (क्रमांक 166) उल्लेख समोर आला आहे. ही गाडी घटनेच्या वेळी नेमकी कुठे होती, तिचा मार्ग काय होता आणि संशयितांचे टायमिंग काय होते, या सर्व तांत्रिक बाबींची पडताळणी सध्या पोलीस करत आहेत. या तांत्रिक आणि डिजिटल तपासातून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयपीएस व्यंकटरामन यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT