Beed Crime News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या टाकळी येथे 20 जून रोजी एका टोळक्याने केलेल्या चाकू हल्ल्यात विलास घुले नावाचा तरूण हाॅटेल चालक मृत्यूमुखी पडला. कट रचून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप घुले याच्या कुटुंबिय आणि ग्रामस्थांकडून केला गेला. भांडण सोडवायला गेलेल्या विलास घुले याच्यावर टोळक्याने चाकूने हल्ला चढवला होता. यात तो ठार झाला. हल्लोखोरांवर कारवाई आणि खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याचा या हत्येमागे हात असल्याचे आरोपही केले गेले. एसआयटीकडून चार तास सौरभची चौकशीही झाली. पण यातून अद्याप काही ठोस हाती लागले नसल्याचे बोलले जाते.
दरम्यान, या हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. एका महिलेने समोर येत विलास घुले आणि उमेश माने या दोघांनी आपल्यावर अत्याचार केले. आक्षेपाहार्य व्हिडिओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार आणि पोलीसात तक्रार दिली तर तुझ्यासह कुटुंबाला ठार मारू अशी धमकी उमेश माने आणि विलास घुले यांनी दिली होती, असा खळबळजनक दावा पिडित महिलेने केला आहे. या वादातूनच विलास घुले याची हत्या झाल्याचे आता बोलले जात आहे.
विलास घुले आणि त्याचा मित्र उमेश माने यांच्या जाचाला आपण व आपले कुटुंब कंटाळले होते. दोघांनी अनेकदा घरात घुसून आम्हाला त्रास दिला, मारहाण केली असा आोपही पिडित महिलेने केला आहे. उमेश माने याने आपल्यावर अत्याचार करून आक्षेपार्ह व्हिडिओ काढले आणि विलास घुले याने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, यातूनच हत्येचा प्रकार घडला असल्याचे आता समोर आले आहे.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, विलास घुलेचा मित्र उमेश माने याने आधी तित्यावर बळजबरी करत अत्याचार केला. यावेळी अत्याचार करतानाचे व्हिडिओ देखील त्याने रेकॉर्ड केले. त्यानंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी देऊन त्याने संबंधित महिलेवर वारंवा अत्याचार करत ब्लॅकमेलही केले.
या त्रासाला कंटाळून पीडितेने हा संपूर्ण प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. जेव्हा पीडित कुटुंब पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते, तेव्हा रमेश घुले याने त्यांना मध्यस्थी करत धमकावले. यापुढे असे होणार नाही, याची जबाबदारी मी घेतो. जर तक्रार द्यायला गेलात तर तुमचं काही खरं नाही, अशी धमकी रमेश घुलेने दिल्यामुळे भीतीपोटी आम्ही पोलिसांत गेलो नाही. या त्रासाला कंटाळूनच पिडित कुटुंब शेत सोडून गावात राहायला गेल्याचे सांगीतले जाते.
गावात राहायला गेल्यानंतरही उमेश माने आणि विलास घुले यांचा त्रास थांबला नाही. ते दोघे बुलेट आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने येऊन सतत त्रास द्यायचे. 3 जून रोजी विलास घुले याने पीडितेला गाठून, सदर महिलेवर माझ्याशी संबंध ठेव ाही तर तुझ्या नवऱ्यासह लेकरांचाही जीव घेऊ, अशी धमकी उमेश आणि विलासने दिली होती. 20 जून रोजी उमेश आणि विलास पुन्हा पीडितेच्या घरासमोर आले. गाडीचा हॉर्न वाजवून त्यांनी पिडित महिलेला व तिच्या नवऱ्याने शिवीगाळ सुरू केली. तेव्हा पिडिताच्या नवऱ्याने आम्हाला सुखाने जगू द्या, अशी विनंती आरोपींकडे केली होती.
20 जून रोजी या वादातूनच पिडितेचे वडील, नवरा आणि काही नातेवाईक हाॅटेलवर विलास घुले याला समजावण्यासाठी गेले होते. मात्र, तिथे विलास आणि उमेश यांनी पुन्हा वाद उकरून काढला. त्यांनी स्वतः आधी काचेच्या बाटल्या आणि विटांच्या तुकड्यांनी पीडितेच्या कुटुंबाला मारहाण केली. त्यांनी आधी हल्ला केल्यामुळे स्वसंरक्षणासाठी आणि रागाच्या भरात पीडितेच्या वडिलांनी हात उचलला आणि त्यातूनच विलास घुलेची हत्या झाल्याचे पिडित महिलेचे म्हणणे आहे. दरम्यान, केज आणि बीड येथे आम्ही तक्रार द्यायला गेले होते, पण पोलीसांनी आमची तक्रारच घेतली नाही. पोलिसांनी आमची तक्रार नोंदवून घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.