BARTI UPSC Scheme: UPSC मुख्य परीक्षा 2026 पात्र SC उमेदवारांना 50 हजारांची मदत; जाणून घ्या अटी आणि अंतिम तारीख

BARTI to Provide Rs 50,000 Financial Aid for SC Candidates: बार्टी, पुणे यांच्या वतीने UPSC मुख्य परीक्षा 2026 साठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
BARTI to Provide Rs 50,000 Financial Aid for SC Candidates
BARTI to Provide Rs 50,000 Financial Aid for SC CandidatesSarkarnama
Published on
Updated on

BARTI News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा 2026 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना या योजनेअंतर्गत एकरकमी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

बार्टीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार या योजनेसाठी पात्र असतील. तसेच संबंधित उमेदवारांनी UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा 2026 साठी पात्रता मिळवलेली असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह सादर करायचा आहे. यामध्ये जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, DAF-1, बँक खात्याचा तपशील आणि UPSC मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) जोडणे बंधनकारक आहे.

BARTI to Provide Rs 50,000 Financial Aid for SC Candidates
Unmesh Patil News: शिवसेनेच्या माजी खासदारावर गुन्हा दाखल; PSI वरील आरोप भोवले, नेमकं प्रकरण काय?

पूर्ण अर्ज आणि कागदपत्रे स्व-साक्षांकित करून [upscbartischeme@barti.in](mailto:upscbartischeme@barti.in) या ई-मेल आयडीवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

BARTI to Provide Rs 50,000 Financial Aid for SC Candidates
PM-FCT New: मुलांच्या आरोग्य, शिक्षणावर सरकारची डिजिटल नजर! काय आहे PM-FCT Tracker?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 असून अधिक माहितीसाठी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आर्थिक मदतीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळणार असून गुणवंत उमेदवारांना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

  • UPSC मुख्य परीक्षा 2026 साठी पात्र SC उमेदवारांना बार्टीकडून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत

  • महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार या योजनेसाठी पात्र

  • अर्जासोबत जात प्रमाणपत्र, DAF-1, Admit Card आणि बँक तपशील आवश्यक

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 निश्चित

  • संपूर्ण अर्ज upscbartischeme@barti.in या ई-मेलवर पाठवावा लागणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com