Vinod Patil Sarkarnama
मराठवाडा

Vinod Patil News : लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले...

Political News : महायुतीकडून भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे. असं असताना आता मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Sachin Waghmare

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन एक महिना झाला तरी महायुतीला छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा तिढा अजून सुटलेला नाही. या जागेवर शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. महायुतीमध्ये जागा कोणाला सुटणार यावर उमेदवार ठरणार आहे. भाजप की शिवसेना शिंदे गट यावर अजून एकमत झाले नाही.

महायुतीकडून भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे. असं असताना आता मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

बुलडाणा येथील सभेला जाण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रविवारी संभाजीनगर मार्गे गेले. दरम्यान, मुंबईला परत जाताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते व छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असलेले विनोद पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची चर्चा होती. परंतु बुलडाण्याहून परतण्यास मुख्यमंत्री शिंदे यांना रात्रीचे बारा वाजले. त्यामुळे विनोद पाटील हे स्वतः चिकलठाणा विमानतळावर जाऊन त्यांना भेटले. पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे त्यांनी स्वागत केले. घाईत दौरा झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे जेवण राहिले होते, त्यांच्यासाठी विनोद पाटील यांच्या घरून खास डबा मागवला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रात्री विमानतळावर भेट घेतली. त्यावेळी मी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यावेळी मी माझ्या जमेच्या बाजू सांगितल्या. त्यांनी माझे म्हणने शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी मला नाही म्हणून सांगितलं नाही किंवा हो म्हणून सांगितले नाही. फक्त 'वेट' म्हणून सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की, मी कळवतो आणि ते कळवतील, असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते तथा मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते तथा मराठा समन्वयक विनोद पाटील आगामी लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर येथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी हवी असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

याबाबत बोलताना विनोद पाटील म्हणाले “मी सांगितलं होतं लोकसभा लढवायची आहे. मला चांगला प्रतिसाद होता. माझा वाढदिवस होता म्हणून वडिलाधाऱ्यांचा आशीर्वाद म्हणून भेट घेतली. त्यांनी मला स्पेशल वेळ दिला. अपेक्षित चर्चा झाली. मला विश्वास आहे इलेक्टीव मेरिटवर एकनाथ शिंदे मला उमेदवारी देतील, अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली.

SCROLL FOR NEXT