Vinod Patil : विनोद पाटलांची मोठी घोषणा; छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार

Maratha Reservation Petitioner Vinod Patil to Contest Lok Sabha Election : मराठा आरक्षणासाठी लढाई लढणाऱ्या विनोद पाटील यांनी आता निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
Vinod Patil
Vinod PatilSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar News :

Maratha Reservation याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे विनोद पाटील यांनी जाहीर केले आहे.

Vinod Patil
Loksabha Election 2024 : नांदेडची जागा काँग्रेसला, पण उमेदवार कोण?

लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप कोणत्याही पक्षाशी आमचं बोलणं झालेलं नाही. जो योग्य वाटेल त्या पक्षाकडून आम्ही निवडणूक लढू किंवा समाज म्हटला तर अपक्षही लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आग्रा येथे साजरी केलेल्या सार्वजनिक शिवजयंतीनंतर शहरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सत्कार मेळावा ठेवला होता. या वेळी विनोद पाटील यांनी ही घोषणा केली.

दरम्यान, मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई संपल्यावर निवडणूक लढवणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच बोललो होतो. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले.

R

Vinod Patil
Loksabha Election 2024 : अस्तित्व दाखवण्यासाठी 'बीआरएस' लोकसभेच्या मैदानात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com