Santosh Deshmukh Case; Vishnu Chate sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा मुक्काम तुरुंगातच; न्यायालयाने जामीन नाकारला

Vishnu Chate High Court Bail : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Jagdish Pansare

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याचा जामीन अर्ज १० ऑक्टोबर रोजी औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. त्यामुळे चाटेचा तुरुंगातील मुक्काम कायम राहणार आहे. तसेच, एका वर्षानंतर त्याला नव्याने जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा असेल, अशी माहिती आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक आरोपींची नावे समोर आली. त्यापैकी विष्णू चाटे याच्यावरही गंभीर आरोप आहेत.

या प्रकरणात चाटेचा सहभाग दर्शवण्यासाठी तपास यंत्रणेने कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक व्हॉइस सॅम्पल यांसारखे पुरावे सादर केल्याची माहिती आहे. आरोपींच्या संपर्कातील फोन संभाषण आणि संपर्कांच्या नोंदी, घटनाक्रमाशी संबंधित हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तसेच संबंधित संभाषणांची पडताळणी करण्यासाठी फॉरेन्सिक व्हॉइस सॅम्पलच्या आधारे सादर केलेले पुरावे यांवरून चाटेचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होत असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला.

चाटे याच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हे नोंद असल्याची माहिती आहे. दरम्यान, विशेष मकोका न्यायालयाने २३ डिसेंबर २०२५ रोजी विष्णू चाटे याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला होता.

या निर्णयाविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते. १० एप्रिल २०२६ रोजी उच्च न्यायालयाने या अपिलावर राज्य सरकारला नोटीस बजावली होती. आता १० ऑक्टोबर रोजी न्यायालयाने चाटेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मात्र, एका वर्षानंतर त्याला नव्याने जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा असेल, अशी माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT