Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरण: विष्णू चाटेची अटक बेकायदेशीर? सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान

Beed Crime News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकऱणातील आरोपी विष्णू चाटे याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. यावर विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांनी विरोध करताना गेल्या दीड वर्षांपासून विष्णू चाटेने कोणतीही तक्रार केली नव्हती.
Ujjawal Nikam Santosh Deshmukh Walmik Karad .jpg
Ujjawal Nikam Santosh Deshmukh Walmik Karad .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांच्या वकीलांनी आज न्यायालयात नवा मुद्दा उपस्थित केला. विष्णू चाटेच्या वकिलांनी त्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला. अटक केल्यापासून 24 तासांत चाटे याला कोर्टात हजर करणे अपेक्षित असताना हजर केले नाही. खुनाच्या गुन्ह्यात 22 दिवस उशिरा ताब्यात घेण्यात आले. या आधारे विष्णू चाटेला जामीन देण्याची मागणी करण्यात आली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकऱणातील आरोपी विष्णू चाटे याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. यावर विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांनी विरोध करताना गेल्या दीड वर्षांपासून विष्णू चाटेने कोणतीही तक्रार केली नव्हती. मात्र ,आता अचानक हा मुद्दा उपस्थित करून खटल्याची सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न आरोपींकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सव्वा वर्षांपूर्वी आरोपपत्र दाखल होऊनही या खटल्याची गती मंद आहे. त्यामुळे हा खटला त्वरित चालवला जावा, तसेत विष्णू चाटे याला जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या विशेष न्यायालयात झाली. विशेष सरकारी वकील उज्जवल निकम सोमवारी (ता.15) न्यायालयात उपस्थित होते. न्या.जयश्री पुलाटे यांच्या न्यायालयात आजच्या सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला.

Ujjawal Nikam Santosh Deshmukh Walmik Karad .jpg
Shivsena News: शिवसेनेचे 16 आमदार आणि 7 खासदार फुटणार? मातोश्रीवरुन धडकला नवा आदेश; 22 जूनला मोठा निर्णय होणार..?

विष्णू चाटेच्या वकिलांनी त्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा न्यायालयात केला. अटक केल्यापासून 24 तासांत कोर्टात हजर करणे अपेक्षित असताना हजर केले नाही. खूनाच्या गुन्ह्यात 22 दिवस उशिरा ताब्यात घेण्यात आले या आधारे विष्णू चाटेला जामीन देण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी या जामीन अर्जाला तीव्र विरोध नोंदवला. मकोका लागू असल्याने तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रित विचार करावा लागेल, असा मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर मांडला. गेल्या दीड वर्षांपासून विष्णू चाटेने कोणतीही तक्रार केली नव्हती, मात्र आता अचानक हा मुद्दा उपस्थित करून खटल्याची सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयाचे लक्ष वेधत सांगितले की, सव्वा वर्षांपूर्वी आरोपपत्र दाखल होऊनही या खटल्याची गती मंद आहे. त्यामुळे हा खटला त्वरित चालवला जावा.

Ujjawal Nikam Santosh Deshmukh Walmik Karad .jpg
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी सांगितले सातारा गॅझिटियरचे महत्व : पश्चिम महाराष्ट्रातील 42 लाख मराठ्यांना मिळणार आरक्षण

निकम काय म्हणाले?

सुनावणी लवकर सुरू करण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केल्याचे निकम यांनी सांगितले. लॅपटॉपची क्लोन कॉपी देण्यात यावी, अशी मागणीही केली होती. फॉरेन्सिक तपासानंतर जे काही प्राप्त झाले तेच आरोपी पक्षाला देण्यात आले आहे. मात्र, जुने मुद्दे पुढे करून हा खटला जाणीवपूर्वक लांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पुनरुच्चार अ‍ॅड. निकम यांनी केला.

संपत्ती जप्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहितीही निकम यांनी दिली. हा खटला पद्धतशीरपणे उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरू असून, यापूर्वीही आरोपींकडून 'डी टू ऑपरेशन डी फाॅर डिले' चालवले जात असल्याचे आपण न्यायालयात नमूद केल्याचे त्यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com