Beed Special Court News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर तीन ते सात क्रमांकाचे आरोपी हे खटला लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज कोर्टाकडे करून वेळकाढूपणा केला जात असल्यामुळे या सर्व आरोपींना कुठल्याही परिस्थितीत दोषमुक्ती देण्यात येऊ नये, असा युक्तीवाद सरकारी वकील उज्जवल निकम यांनी न्यायालयात केला.
बीडच्या विशेष न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीत उज्जवल निकम (Ujjwal Nikam) यांनी आरोपींकडून वारंवार केल्या जाणाऱ्या अर्जांवर युक्तीवाद करताना खटला लांबवण्याच्या हेतूनेच हा सगळा प्रकार केला जात असल्याचा दावा केला. खटल्यातील आरोपींकडून 'डी टू' ऑपरेशन सुरु असल्याचे निकम म्हणाले. आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींच्या दोष मुक्ती अर्जावर युक्तिवाद झाला. याच दोष मुक्तीच्या अर्जाला उज्वल निकम यांनी कडाडून विरोध केला. कोर्टाने पुढील सुनावणी 24 सप्टेंबर रोजी ठेवली आहे.
या प्रकरणातील आरोपींकडून 'डी फॉर - डिले द ट्रायल अँड डी फॉर - डिरेल द ट्रायल' चे प्रयत्न सुरू आहेत. आरोपींकडून वेळोवेळी वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे अर्ज केले जात आहेत. या खटल्याची सुनावणी लांबविण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याने याकडे न्यायालयाचे लक्ष वेधल्याचे निकम यांनी माध्यमांना बोलताना सांगीतले. आरोपी (Walmik Karad) वाल्मिक कराड, विष्णू चाटे वगळता इतर आरोपींकडून दोष मुक्तीचा अर्ज करण्यात आला.
याच दोष मुक्तीच्या अर्जा संदर्भात त्यांच्या वकिलाने युक्तिवाद केला. सीआयडीने एकत्रित आरोप पत्र दाखल केले, हे चुकीच आहे. हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना नाही. हा अधिकार केवळ न्यायालयाचा आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाचा कोल्हापूर येथील अंजनाबाई गावित खटल्याचा निकाल आधार म्हणून देण्यात आला. दरम्यान जिल्हा न्यायालयाने वाल्मिक कराडचा दोषमुक्ती आणि जामीन अर्ज फेटाळल्याने कराडने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर 19 तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे याची सुनावणी होणार असल्याचे निकम म्हणाले.
पुढील सुनावणी 24 रोजी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचा तुरुंगातील मुक्काम वाढल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी आज झाली. गेल्या सुनावणीत काही आरोपींच्या अर्जावर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. काही अर्जाच्या बाबत मूळ फिर्यादींचे म्हणणे न्यायालयासमोर न आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.