Ujjwal Nikam: मोदींच्या राज्यात अखंड भारताचं स्वप्न लवकरच सत्यात उतरणार! खासदार उज्वल निकम यांना विश्वास

Ujjwal Nikam: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भाजपकडून पुण्यात विभाजन विभिषिका दिवस पाळला गेला.
Ujjwal Nikam
Ujjwal NikamSarkarnama
Published on
Updated on

Ujjwal Nikam: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भाजपकडून पुण्यात विभाजन विभिषिका दिवस पाळला गेला. यानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा सारसबाग येथून पूरम चौकापर्यंत मुकयात्रा काढण्यात आली. या मुख्य यात्रेमध्ये राज्यसभा खासदार उज्वल निकम यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी अखंड भारताचं स्वप्न मोदींच्या राज्यात लवकरच सत्यात उतरणार असल्याचं विधान केलं. या विधानामुळं खासदार निकम चर्चेत राहिले.

Ujjwal Nikam
Bihar SIR Update: मोठी बातमी! बिहारच्या SIR प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या 65 लाख मतदारांची नावं जाहीर होणार; सुप्रीम कोर्टाचे आदेश

या यात्रेनंतर माध्यमंशी बोलताना उज्वल निकम म्हणाले, "भारताला स्वतंत्र १५ रोजी ऑगस्ट निश्चित भारताला आनंद झाला. त्याबरोबरच १४ ऑगस्ट ही तारीख सर्वसामान्य भारतीयांना कधी विसरता येणार नाही, कारण या दिवशी आमच्या भारतीयांशी काही व्यक्तींनी अतिशय वाईटरित्या व्यवहार केला आहे आणि ही भावना आज ही आमच्या मनात तेवत आहे.

Ujjwal Nikam
Gallantry Awards : 'ऑपरेशन सिंदूर' गाजवणाऱ्या 36 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, मराठी अधिकाऱ्यांचाही समावेश; 'हे' अधिकारी ठरले 'सर्वोत्तम योद्धा'

आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं ते थोर स्वातंत्र सैनिकांच्या आहुतीमुळे मिळालेला आहे, हे आम्ही विसरू शकत नाही. यामध्ये वीर सावरकर यांच्यासह असे अनेक थोर सेनानी होऊन गेले. परंतु आम्हाला खात्री आहे की, भारत पुन्हा एकदा अखंड होईल. जो भारत आपल्यापासून 14 ऑगस्टला दूर गेला तो पूर्ण करण्याचं काम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील असा मला विश्वास आहे.

Ujjwal Nikam
EVM Recounting : धक्कादायक! भारतात पहिल्यांदाच EVMचा झाला पराभव; सुप्रीम कोर्टात फेर मतमोजणीत हारलेला उमेदवार झाला विजयी

सरकारी वकील म्हणून काम करत असताना खासदार हे पद मिळाल्यानं उज्वल निकम हे योग्य रितीने न्याय देऊ शकतील का? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता. त्यावर बोलताना निकम म्हणाले, सरकारी वकील म्हणजे मी पगारी नोकर नाही. ज्यांच्या कोणाच्या अशा भामक कल्पना आहेत, त्यांना न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, असं निकम यांनी सांगितलं.

Ujjwal Nikam
Raj Thackeray on Meat Ban: मांसबंदी करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेला राज ठाकरेंचं थेट आव्हान! कार्यकर्त्यांना दिला 'हा' कार्यक्रम

या यात्रेमध्ये उज्वल निकम यांच्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे. आमदार हेमंत रासने. पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, विश्वास ननावरे, प्रियांका शेंडगे शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com