Walmik Karad Sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad : धक्यावर धक्के! वाल्मिक कराडचं साम्राज्य नष्ट होणार? एसआयटीने कोर्टाकडे केली 'ही' महत्त्वाची मागणी

Santosh Deshmukh murder case : सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सुरुवातीला केवळ खंडणी प्रकरणाशी आपला संबध असल्याचं सांगत कराड पोलिसांना शरण आला होता.

Jagdish Patil

Beed News, 25 Jan : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सुरुवातीला केवळ खंडणी प्रकरणाशी आपला संबध असल्याचं सांगत कराड पोलिसांना शरण आला होता.

मात्र, त्याचा आणि हत्या प्रकरणातील आरोपींचे काही संभाषण, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे कराडचा (Walmik Karad) आणि हत्या प्रकरणाचा थेट संबंध असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याच्यावर संतोष देशमुख हत्येप्रकरणाचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्यावर आता मकोका अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे.

वाल्मिकला अटक करताच त्याची बीड, (Beed) परळीसह पुण्यातील विविध ठिकाणची मालमत्ता उघडकीस आली. त्याने गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती भरपूर असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता विशेष तपास पथकाने वाल्मिक कराडच्या मालकीच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे.

शिवाय त्याच्या मालमत्तेची सर्व माहिती गोळा करण्यात आली असून त्याबाबतचं रेकॉर्ड समोर येताच ती जप्त केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्व मालमत्ता जप्त केल्यास कराडसाठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

वाल्मिक कराडला अटक केल्यापासून त्याच्या पत्नीच्या नावावर पुणे आणि बीडमध्ये जमीन, फ्लॅट अशा मालमत्ता असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे आता एसआयटीने कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी बीडमधील विशेष न्यायालयात एसआयटीकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे.

महादेव मुंडे खून प्रकरणातही कराडचा हात?

दरम्यान, आता 14 महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांचा खून झाला होता या प्रकरणातही कराडचा हात असल्याचा दावा केला जात आहे. या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक केली नाही? असा सवाल महादेव मुंडे यांच्या पत्नीने उपस्थित केला आहे. तर याच पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनीही शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कराडच्या अडचणीत मोठी वाढ होत आगे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT