
Jalna News, 25 Jan : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासह विविध आठ मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील शनिवारपासून (ता.25) पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. आंतरवाली सराटी येथील स्थगित केलेले उपोषण ते आजपासून सुरू करणार आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे जवळपास मागील 18 महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यानी आतापर्यंत सहा वेळा आमरण उपोषण केलं आहे. तर एकदा ते मुंबईच्या वेशीवर जाऊन आले आहेत.
त्यांच्या आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर चालणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. तर पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होताच. जरांगेंनी सरकारला दिलेला शब्द पाळा अशी आठवण करून दिली होती.
शिवाय मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत तर पुन्हा आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आता आजपासून ते पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी अंतरवाली सराटीत बसणार आहेत. तर जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
- महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी मराठा एकच आहे त्यामुळे सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं.
- हैदराबाद, सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करत त्यांची अंमलबजावणी कराय.
- माजी न्यायमूर्ती शिंदे समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करावं आणि या समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्यावी.
-आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
- मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस मागे घेत, सर्व गुन्हे रद्द करावेत.
- सरकारने 10 टक्के SEBC आरक्षण लागू केले मात्र, ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केले ते रद्द केलेले आरक्षण पुन्हा सुरू करावे.
- कुणबी नोंदी शोधण्यासाठी आणि व्हॅलिडीटी देण्यासाठी, जिल्हा, तालुकास्तरावर कक्ष स्थापन केले होते ते पुन्हा सुरू करावेत.
- मराठा समाज हा शेती करणारा वर्ग आहे म्हणजेच कुणबी आहे. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे .हा सुधारित जीआर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.