Walmik Karad Appeal In Mumbai High Court Bench Aurangabad News Sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad News : दोषमुक्ती नाही अन् जामीनही मिळेना ! आता वाल्मीक कराडची खंडपीठात धाव..

Valmik Karad has approached the Bombay High Court Aurangabad Bench : सहा डिसेंबर 2024 रोजी वाल्मीक कराड विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातून आपल्याला वगळण्यात यावे असा अर्ज कराड याने वकिलांमार्फत केला होता.

Jagdish Pansare

High Court News : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणीच्या वादातून अपहरण करून निर्घूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड सध्या बीडच्या तुरूंगात कैद आहे. बीडच्या विशेष न्यायालयात दोषमुक्ती आणि जामीनासाठी वारंवार अर्ज करूनही दिलासा मिळत नसल्याने कराड हतबल झाला आहे. 'मोक्का'तून आपले नाव वगळण्यात यावे यासाठी वाल्मीक कराडच्या वकिलांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.

याप्रकरणी खंडपीठाचे न्यायमूर्ती संदीप कुमार सी. मोरे आणि न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांनी गुरुवारी शासनाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले. या अर्जावर पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी वाल्मीक कराडने (Walmik Karad) दोषमुक्ती आणि मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यातून नाव वगळण्याच्या मागणीसाठी बीडच्या विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता. मात्र तो नामंजूर करण्यात आला.

आता या आदेशाविरोधात वाल्मीक कराड याने फौजदारी अर्ज खंडपीठात दाखल केला आहे. आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना फोनवरून धमकी दिल्याबद्दल व त्यानंतर संतोष देशमुख यांनी खंडणीस विरोध करत कंपनीच्या परिसरात घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून सहा डिसेंबर 2024 रोजी वाल्मीक कराड विरोधात गुन्हा दाखल झाला होता. (Beed News) या गुन्ह्यातून आपल्याला वगळण्यात यावे असा अर्ज कराड याने वकिलांमार्फत केला होता.

तो अर्ज 22 जुलै 2025 नामंजूर केला होता. दरम्यान अपिलार्थीचे नाव प्रथम माहिती अहवालात नसल्याचा मुद्दा कराड यांचे वकील अॅड. संकेत कुलकर्णी आणि सत्यव्रत्त जोशी यांच्यामार्फत खंडपीठात दाखल अर्जाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. दरम्यान पवन ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या आवादा कंपनीला वाल्मीक कराडच्या टोळीने दोन कोटींची खंडणी मागितली होती.

कंपनीच्या मस्साजोग येथील कार्यालयात जाऊन कराड यांच्या टोळीने सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संतोष देशमुख यांचेच अपहरण करून सहा डिसेंबर रोजी निर्घूण हत्या करण्यात आली होती. या हत्येमागचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड असल्याचे दोषारोप पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे संघटित गुन्हेगारी कालमाअंतर्गत कराड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT