Beed News : आधी वकील, आता बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याने संपवले जीवन!

Beed was shaken once again as a dismissed police officer ended his life. : सुनील नागरगोजे यांनी परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली होती. लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभारही सांभाळला होता.
Police Inspector News Beed District News
Police Inspector News Beed District NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : गेल्या महिन्यात बीडच्या न्यायालयातच एका वकीलाने खिडकीला गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. या घटनेने बीड हादरले असताना आता अंबाजागोईत एका बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेत आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेवेतून बडतर्फ केल्यामुळे बदनामी होत असल्याने तणावातून पोलीस निरीक्षकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते.

आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव सुनील नागरगोजे (रा. नागदरा, ता. परळी) असे आहे. सुनील नागरगोजे यांच्या आत्महत्येनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. (Beed News) गणपती आणि महालक्ष्मीच्या सणासाठी नागरगोजे कुटुंबिय नागदरा या मूळगावी गेले होते. त्यामुळे सुनील नागरगोजे हे अंबाजोगाई येथील घरी एकटेच होते. काल रात्री 8 वाजता त्यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली.

सुनील नागरगोजे यांनी परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली होती. लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभारही सांभाळला होता. (Police) परभणी येथे कार्यरत असताना त्यांचा पोलीस अधीक्षकांशी मोठा वाद झाला होता. यातून नागरगोजे यांनी शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. याची विभागीय स्तरावर चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांची बीडच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. तिथेही नागरगोजे यांनी एका कर्मचाऱ्याशी वाद आणि त्यातून शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

Police Inspector News Beed District News
Police Notice Manoj Jarange : मोठी बातमी! आझाद मैदान खाली करा, मनोज जरांगेंना पोलिसांची नोटीस

या दोन्ही प्रकरणामुळे नागरगोजे अडचणीत आले होते. एप्रिल 2025 मध्ये त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. या कारवाईने त्यांना धक्का बसला आणि तेव्हापासून ते कायम तणावात असयाचे. या तणावातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलंत गळफास लावून घेतल्याचे बोलले जाते. अंबाजोगाईत नागरगोजे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्यांनी अंबाजोगाईमध्येच भाड्याच्या घरात राहत होते. त्यांची मुलं पुण्यात शिक्षण घेतात, तर घरातील इतर सदस्य सणासाठी मुळगावी गेले होते.

Police Inspector News Beed District News
Beed Crime : "गाडीतीलं पेट्रोल संपलंय..."; म्हणत मध्यरात्री मदत मागायला आले अन् घात केला; बीडमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला

सोमवारी रात्री 8 वाजता सुनील नागरगोजे यांनी गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. नागरगोजे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com