Beed News: भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे बॅनर झळकलं होतं. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्यानंतर Walmik Karad poster controversy हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा वाद संपत असतानाच पुन्हा वाल्मिकचे दोन बॅनर समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. यातील एका बॅनरवर वाल्मिक कराडला मदत करा म्हणून आवाहन करण्यात आले आहे.
'वाल्मिक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर वाल्मिक अण्णाचे नाव व चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे. फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा. तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील. थोडीशी मदत.. आण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी...' अशा मजकुराचे हे बॅनर समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
वाल्मिकला मदत करा, अशी विनंती करणाऱ्या बॅनरबरोबरच फोन पे चे स्कॅनर देखील लावण्यात आले आहे. जे संदीप गोरख तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याचे आहे. संदिप तांदळे याने आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंह बांगर यांना व्हिडिओ बनवून खुलेआम धमकी दिली होती. एवढेच नाही तर सावरगाव येथील भगवान गडावर याच संदीप तांदळे याने वाल्मिक कराडच्या फोटो झळकावला होता.
हे बॅनर कोणी तयार केले त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भगवान गड प्रशासनाने केली आहे. याप्रकरणी अंमळनेर पोलिसात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाल्मिक कराडचा फोटो असलेले बॅनर दसरा मेळाव्यात झळकले होते. वाल्मिकला मदत करा असे त्यावर म्हटले होते.
पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मदत करा त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा बाहेर काढण्यासाठी मदत करावी असा मजकूर बॅनरवर छापून स्कॅनर तयार करून वाल्मिक कराडचा फोटो लावून मदत मागणाऱ्या संदीप तांदळे यांची प्रतिक्रिया आता या प्रकरणी समोर आली आहे. "मला बदनाम करण्यासाठी आणि मला गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी हे बनावट बॅनर व्हायरल केले आहे," असे तांदळे यांने म्हटले आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित दसरा मेळाळ्यात वाल्मिक कराड यांचे पोस्टर दिसल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. हा Dasara Melava Beed मेळावा नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने मुंडे समर्थकांसह भक्तांनी हजेरी लावली होती. मात्र, या Walmik Karad poster controversy मुळे उत्सवाचे वातावरण एकदम तापले. समर्थकांनी हे पोस्टर लावल्याची शक्यता असली तरी, यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. या बॅनरमुळे पंकजा मुंडे यांची राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचेही बोलले जाते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांना समर्थन देणारे हे पोस्टर “We Support Anna, कराड आमचे दैवत” असे सांगत होते. यामुळे बीडचे राजकारण कुठल्या दिशेने जात आहे, याचा लोकांनी विचार करावा, अशी चर्चा सुरु आहे. खून आणि खंडणी प्रकरणातल्या आरोपी वाल्मिक कराडचे खुलेआम समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता सर्वच स्थरातून होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.