Walmik Karad admitted to Beed District Hospital after health condition worsens. sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad News : वाल्मिक कराड तुरुंगाबाहेर! वाढलेली दाढी, डोक्यावर पांढरे केस, हात दोरखंडांने बांधलेले..., नेमकं कारण काय?

walmik Karad Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला पोलिस बंदोबस्तात तुरुंगाबाहेर आणण्यात आले आहे. बीडच्या ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे.

Jagdish Pansare

Beed Crime News : एकेकाळी बीड जिल्ह्यावर अधिराज्य गाजवणारा, मंत्र्यासोबत वावरणारा आणि संपूर्ण बीड जिल्ह्यात दहशत असणाऱ्या वाल्मिक कराडची जेलमध्ये राहून अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. प्रकृती बिघडल्यामुळे त्याला आज प्रचंड पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते.

अंगात गुलाबी रंगाचा शर्ट, वाढलेली दाढी, डोक्यावर पिकलेले केस, हातात दोरखंड अशा अवस्थेत पोलीसांनी त्याला रुग्णालयात आणले होते. वाल्मिक कराडला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणणार असल्याची माहिती त्याच्या समर्थकांना मिळाल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात परिसरात गर्दी केली होती.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांकडून त्याची तपासणी सुरू असून तपासणीनंतरच त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. बीडच्या विशेष न्यायालयात या सर्व आरोपींवर खटला सुरू असून वाल्मीक कराड याने आतापर्यंत जामीनासाठी केलेले सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

अगदी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही वाल्मीक कराड याला जामीन नाकाराला आहे.

सुटकेचे सगळे मार्ग बंद झाल्यामुळे वाल्मीक आणि त्याचे इतर साथीदार आरोपी हे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. वाल्मीक कराडला जेलमध्ये सर्व सुविधा मिळतात, त्याला घरचे जेवण मिळते, तो मोबाईलचा वापर करतो, असे आरोप वारंवार केले गेले. त्याला बीडच्या तुरूंगातून इतर ठिकाणी हलवावे, अशी मागणीही केली गेली. याशिवाय जेलमध्ये कराड समर्थक आणि विरोधक कैद्यांमध्ये अनेकदा राडाही झाल्याचे पहायला मिळाले होते.

दरम्यान, वाल्मीक कराडने तुरुंग अधिकाऱ्यांकडे आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे तक्रार केली होती. त्यानंतर आज सकाळीच पोलिस बंदोबस्तात वाल्मीकला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून आरोपी वाल्मीक कराडच्या तपासणी केल्यानंतर काही चाचण्या करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT