Family of murdered sarpanch Santosh Deshmukh reacts with relief after court rejects mastermind Walmik Karad's acquittal plea in the murder case Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Case : "या लढाईचा शेवट..."; कोर्टाने वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताच धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

Walmik Karad Case : वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी न्यायालयाकडे विनंती अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी (ता.22) न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. या सुनावणीत बीड सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडचा दोषमुक्तीसाठीचा अर्ज फेटाळला आहे.

Jagdish Patil

Beed News, 22 Jul : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या संपत्ती जप्ती बाबतच्या अर्जावर 7 जुलै रोजी युक्तिवाद झाला होता.

7 जुलैच्या सुनावणीनंतर वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी न्यायालयाकडे विनंती अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी (ता.22) न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. या सुनावणीत बीड सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडचा दोषमुक्तीसाठीचा अर्ज फेटाळला, तर त्याच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.

न्यायलयाच्या या निर्णयामुळे देशमुख कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर कराडसह इतर आरोपींवर आता खंडणी आणि खूनाचा खटला चालू राहणार आहे. न्यायालयाच्या याच निर्णयावर सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीने जो तपास केला, त्यात ठोस पुरावे आहेत. त्यामुळे कराडचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळला जाईल, अशी आम्हाला अपेक्षा होती आणि तेच घडलं, असं म्हणत त्यांनी कोर्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं.

तर या लढाईचा शेवट हा आरोपींच्या फाशीनेच झाला पाहिजे असं आमचं मत असल्याचंही धनंजय देशमुख म्हणाले. त्याचवेळी या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे? त्याचा तपास होत नाही हे तपास यंत्रणेचे अपयश आहे, असं म्हणत त्यांनी आंधळेला शोधून अटक करा अशी मागणी देखील यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT