Beed News, 18 Jan : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीडमधील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील 6 आरोपींच्या कोठडीची मुदत शनिवारी (ता.18) संपली. या आरोपींच्या जामीन अर्जावर आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयाने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. त्यानुसार आता ती 22 जानेवारी रोजी होणार आहे. तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याचा निर्णय न्यायमूर्ती सुरेखा पाटील यांनी दिला.
बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) न्यायालयातून कोठडीत घेऊन जात असताना त्याच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली होती.
यावेळी संतोष देशमुख यांचे समर्थक आणि कराडचे समर्थक आमनेसामने आले होते. असा काही प्रकार होऊ नये म्हणून आजची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. तर, मस्साजोग येथील आवादा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी, 14 जानेवारीच्या सुनावणीत, केज न्यायालयाने कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मात्र यानंतर लगेच कराडच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जावर देखील आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. त्यानुसार आता ही सुनावणी 22 जानेवारी रोजी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.