
Beed News, 17 Jan : मागील काही दिवसांपासून बीडमध्ये सुरू असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांची मालिकांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असतानाच बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली.
त्यामुळे बीडमधील (Beed) कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता शुक्रवारी बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील महिला सरपंचाला माजी सरपंच, सदस्य आणि उपसरपंचाच्या पतीने तब्बल एक लाख रूपयांची खंडणी मागितल्याचं उघडकीस आलं आहे.
विकास कामासाठी आलेल्या चार लाखांपैकी एक लाख देण्याची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसंनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपासाला सुरूवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा या गावच्या महिला सरपंचाला याच गावातील वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुख यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस (Police) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणी मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गावाच्या विकासकामात हे तिघेजण सतत अडथळा आणत होते. अशातच 16 ऑगस्ट 2024 रोजी गावच्या विकास कामासाठी आलेल्या निधीपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुख यांनी केली. याप्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ममदापूर पाटोदा गावात शाळा दुरुस्तीच्या कामासाठी 4 लाख रूपयांचा निधी मंजूर होऊन आला होता. त्यानुसार शाळेचं काम सुरू करण्यात आलं. पण त्याचवेळी गावातील वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुख यांनी या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय 4 लाखांपैकी एक लाख रूपयांची सरपंच मंगल राम मामडगे यांच्याकडे मागणी केली. या प्रकरणी सरपंचांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माजी सरपंच, एक सदस्य व उपसरपंचाचे पती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.