Aurangababd News : राजकीय हेतुने प्रेरित होऊन याचिका करताना खंडपीठाचा वेळ घेतल्याप्रकरणी मनोज घोडके याला खंडपीठाने पन्नास हजारांचा दंड केला. (High Court News) जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामत भ्रष्टाचार झाला, अनियमितता, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांचा हस्तक्षेप झाल्याचा युक्तीवाद करत याचिका दाखल करण्यात आली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे (Aurangabad) न्या. विभा कंकणवाडी व न्या. अभय वाघवसे यांनी याचिका फेटाळत राजकीय द्वेषापोटी याचिका केल्याचे निरीक्षण नोंदविले. घोडके याने संबंधित नवीन इमारतीच्या निविदा प्रक्रियेला आव्हान दिले नव्हते. (High Court) संबंधित प्रकरणात पोलिस हस्तक्षेप करू शकत नसल्याचा युक्तीवाद राज्य शासनाच्या वतीने करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते मनोज घोडके यांनी जिल्हा परिषदेच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करीत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. (Marathwada) २० कोटीची ९९ लाखांची इमारत ३७ कोटींवर गेल्याचे नमूद केले. इमारतीच्या कामासाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती. या प्रकरणात घोडके यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
शिवाय पोलिस आयुक्तांना निवेदनही देण्यात आले होते. गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशी करावी, असे त्यात नमूद केले होते. परंतु याची दखल न घेतल्यामुळे घोडके याने खंडपीठात याचिका दाखल केली. मुख्य सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी इमारतीच्या बांधकामात किरकोळ अनियमितता होती परंतु त्यात संबंधितांना नोटीस बजावली व इतरांची विभागीय चौकशी प्रस्तावित केल्याचे सांगितले. याचिकाकर्त्याने निविदा प्रक्रियेला आव्हान दिले नसल्याचा युक्तीवाद अॅड. काळे यांनी केला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.