Girish Mahajan On Maratha Protest : निर्णयासाठी सरकार एक महिन्याचा वेळ मागणार ; महाजन अंतरवालीत..

Jalna Political News : कालच्या बैठकीत या विषयावर सविस्तर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटेल.
Girish Mahajan News
Girish Mahajan NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना शासन निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा अवधी मागणार आहे. (Jalna Maratha Protest News) सरकारच्या वतीने शिष्टाई करण्यासाठी आणि काल मुंबईत झालेल्या बैठकीतील निर्णयाची माहिती देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे आणि जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे हे अंतरवाली सराटीत पोहचले आहेत.

Girish Mahajan News
Jalna Maratha Protest : येणाऱ्या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे..

तत्तपुर्वी विमानतळावर बोलतांना गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सरकारच्या वतीने आपण जरांगे पाटील यांच्याकडे एक महिना वेळ देण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले. (BJP) सोमवारी झालेल्या बैठकीत काही निर्णय झाले आहेत.

पण मंत्रीमंडळ बैठक घेऊन लगेच निर्णय शक्य होणार नाही. (Maratha Reservation) हेच मनोज जरांगे पाटील यांना सांगून त्यांच्या मागण्यांवर एक महिन्यात निर्णय होईल, तेवढा अवधी दिला पाहिजे, अशी विनंती करणार असल्याचे महाजन म्हणाले.

कालच्या बैठकीत या विषयावर सविस्तर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटेल, थोडी सबुरी ठेवण्याची गरज आहे. हा सगळा विषय बैठक घेतली आणि अध्यादेश काढला असा नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना आम्ही आरक्षण दिल आणि ते टिकवलंही होतं.

पण महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरेंच्या काळात ते त्यांना टिकवता आले नाही. पण आता पुन्हा राज्यात आमचं सरकार आहे, आम्ही निश्चित न्याय देऊ. यासाठी समिती नेमून तीन महिने झाले आहेत. थोडा वेळ लागतो आहे, पण तो द्यावा लागेल. एक महिन्याच्या वेळ आम्हाला हवा आहे, त्यासाठी जरांगे पाटील यांची समजूत काढणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com