Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleel Sarkarnama
मराठवाडा

आम्ही शांततेत मुंबईत येतोय, दाबण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न कराल तर रस्त्यावर उतरू

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः मुस्लिम आरक्षण व वक्फ बोर्डाची हजारो एकर जमीन वाचवण्यासह इतर मुद्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही मुंबईत येणार आहोत. शांततेने, जबाबदारीने प्रश्न मांडण्याचा आम्हाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. त्यामुळे कुठेही आडकाठी न आणता मुंबईत येऊ द्यावे. आम्हाला दाबण्याच, धमकावण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न केला तर रसत्यावर उतरून आंदोलन करू, अशा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.

उद्या ११ डिसेंबर रोजी मुंबईत एमआयएमच्या वतीने मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमीनीसह इतर मुद्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी आयेजित पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी प्रशासनाला वरील इशारा दिला. इम्तियाज जलील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिलेला आहे. इम्पेरिकल डाटा व सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून हे आरक्षण दिले गेले.

परंतु अद्याप कुठल्याच सरकारने याची अंमलबजावणी केली नाही. या शिवाय राज्यात गोर-गरीब मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी असलेली वक्फ बोर्डाची ९३ हजार एकर जमीन, त्याची देखभाल करण्यासाठी सरकारने केवळ २३ लोकांची नेमणूक केलेली आहे. सत्तेत बसलेल्या आधीच्या आणि आताच्या नेते, मंत्र्यांनी या जमीनी मुस्लिमांना मिळू नये असेच वाटत असावे.

त्यामुळे या दोन प्रमुख व इतर मागण्या घेऊन आम्ही हा मोर्चा आयोजित केला आहे. यापुर्वी २७ नोव्हेंबर रोजी आम्ही मुंबईत जाणार होतो, पण कोरोनाचे कारण पुढे करत आम्हाला परवानगी नाकारण्यात आली. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेस, भाजप या सगळ्या पक्षांचे मेळावे, नेत्यांच्या सभा, मोर्चे होत होते. त्यांना कोरोनाचे नियम नव्हते. पण आम्हाला मात्र कोरोनाचे नियम दाखवले गेले.

आता आम्ही उद्या मुंबईत जात आहोत. शातंतेच्या मार्गाने खाजगी वाहनांवर तिंरगे झेंडे लावून शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही आमच्या मागण्या सरकारसमोर मांडणार आहोत. प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. पण जर आम्हाला दाबण्याचा, धमकावण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न केला तर मग रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी शेवटी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT