BJP Leader Pankaja Munde Latest Marathi News
BJP Leader Pankaja Munde Latest Marathi News  Sarkarnama
मराठवाडा

पंकजा मुंडेंच्या मनात काय चाललयं?,अमित शहांच्या बहुचर्चित दौऱ्यापासून दुरच!

विष्णू सानप

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं आणि भाजपने (BJP) शिंदे गटाच्या आमदारांच्या समर्थनाने राज्यात नवं सरकार स्थापन केलं. हे सर्व घडवून आणण्यासाठी या पाठीमागे भाजपचा हात होता हे उघड गुपित आहे. सरकार स्थापन झाल्यावर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांना भाजप पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यायला भाग पाडले.

दरम्यान सत्तांतर पहिल्यांदाच भाजपचे चाणाक्य म्हणून ओळख असेलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दोन दिवसीय मुंबई दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चाही झाली. राज्यातील भाजप नेत्यांनी शहांच जोरदार स्वागत केलं. मात्र एव्हढं सर्व घडत असतांना भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्या आणि कोअर कमिटीच्या सदस्य पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) मात्र या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसले. त्या शहा यांच्या बैठकीला हजर राहतील असं बोलल गेलं मात्र त्यांनी या बैठकीलाही दांडी मारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे पंकजांच्या मनात नेमक चाललं तरी काय?, अशा चर्चा राजकीय वर्तूळात रंगत आहेत. (BJP Leader Pankaja Munde Latest Marathi News)

शहा यांनी लालबागचा राजाच्या दर्शनाने मुंबई दौऱ्याचा शुभारंभ केला. निमित्त दर्शनाचं असलं, तरी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचं मुंबई महापालिकेतून 'विसर्जन' करण्याचं शाहांचं उद्दिष्ट असल्याचं बोलल जात आहे. यानिमित्ताने त्यांनी मुंबई पालिका निवडणुकीची रणनीती ठरवली आहे. तसेच आगामी मुंबई पालिका निवडणुकीत १५० प्लस जागा निवडून आणण्याचा निर्धारही केला. फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने २०१४ मध्ये युती तोडली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असा आदेशच शहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा आणि लोकसभा केंद्रस्थानी ठेवून शहा यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, संभाजी पाटील-निलंगेकर आदी उपस्थिती होते. या बैठकीत नवे राजकीय समीकरण, शिंदे गटासोबतची मैत्री, त्यावरील जनमत, पुढच्या निवडणुकीतील फायदे-तोटे आणि सरकारचा कार्यक्रम यांवर शहांनी प्रत्येकाची मते जाणून घेतली. मात्र नेमकी याच बैठकीला पंकजांनी दांडी मारली. यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगत आहे. मात्र पंकजा यांनी कमालीच मौन पाळलं आहे. आता नवं सरकार स्थापन झाल आणि मंत्रिमंडळ विस्तारही झाला मात्र, पंकजांना यामध्ये स्थान मिळालं नाही. यावरूनही त्या नाराज असल्याच बोललं गेलं. याबाबत त्यांनीही आपल्यापेक्षा जास्त पात्रता असणारांना संधी दिली आहे. आपली पात्रता असेल तेव्हा संधी मिळेल,असा टोमणा देखील मारला होता. आता त्यांनी शहांच्या दौऱ्याला दांडी मारत राष्ट्रीय पातळीवरी भाजप श्रेष्ठींना इशारा तर दिला नाही ना?, असंही बोललं जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्या फारस लक्ष देत नाहीत. यामुळे पंकजा या नाराज असल्याचे बोलले जातं. विधान परिषद आणि त्यानंतर सरकारमध्येही त्यांना सामावून न घेतल्याने मुंडे यांच्या समर्थकांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यामुळे राज्यात भाजपचे सरकार येऊनही मुंडे या फारशा सक्रिय दिसत नाही. मात्र, शहांच्या दौऱ्यात त्या दिसतीस, असे अनेकांना वाटले होते. पण त्या कुठेच न दिसल्याने चर्चा रंगली. यावर मुंडे यांच्या गौरी असल्याने त्या बैठकीला येऊ शकल्या नसल्याचे कारण दानवेंना द्याव लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT