दसरा मेळावा : पंकजा मुंडेसारखी वेळ उद्धव ठाकरेंवर येणार का?

Pankaja Munde|Uddhav Thackeray : जे पंकजा मुंडेसोबत घडलं तसेच उद्धव ठाकरेंसोबतही घडेल का?
Pankaja Munde & Uddhav Thackeray
Pankaja Munde & Uddhav Thackeray Sarkarnama

ापुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे शिवसेना कुणाची आणि पक्षाचं चिन्ह कुणाचं,असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) प्रलंबित आहे.

दरम्यान शिवसेनेचा (Shivsena) पारंपरिक दसरा मेळावा हा कोण घेणार याबाबतही आता प्रश्न निर्माण झाला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेकडून मुंबई पालिकेकडे काही दिवसांपुर्वीच अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. आता शिंदे गटाच्या वतीने आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनीही शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आज अर्ज दाखल केला आहे. यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Pankaja Munde & Uddhav Thackeray Latest News)

Pankaja Munde & Uddhav Thackeray
फडणवीस म्हणतात, मी महाराष्ट्रात तुम्हाला नकोय का?

सत्तेची ताकद दाखवत मुख्यमंत्री शिंदेंनी शिवजी पार्क मैदानावर परवानगी मिळवली तर उद्धव ठाकरेंना मुंबईतील दुसरे मैदान शोधण्याची वेळ येऊ शकते. अशीच वेळ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही आली होती. तेव्हा त्यांना भगवान गडावर होणाऱ्या आपल्या दसरा मेळाव्याची जागा बदलून बीड जिल्ह्यातील संत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगावला म्हणजे भगवान भक्तीगडावर घ्यावा लागला होता. आताही त्या तिथेच मेळावा घेतात. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) सारखी वेळ यंदा उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) येते की काय?,अशीही चर्चा होत आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत दसऱ्याच्या दिवशी दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा राहिली आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडली आहे. यामुळे शिवसेना कुणाची आणि पक्ष चिन्ह कुणाचं याबाबतचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. हा निर्णय जेव्हा यायचा तेव्हा येईलच. मात्र उद्धव ठाकरेंना नामोहरम करण्याची एकही संधी मुख्यमंत्री शिंदेंकडून सोडली जात नाही. हे खर. आता शिवसेनेचा परंपरागत असलेला दसरा मेळावाही हायजॅक करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होताना दिसत आहे.

शिवाजी पार्क मैदानावर (शिवतिर्थावर) शिंदे गटाकडून दसरा मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून त्यासाठी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला आहे. यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद चिघळण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या वतीने दरवर्षी आमदार सरवणकरच या परवानगीसाठी मागणी करायचे.मात्र ते आता शिंदे गटात गेले आहेत.

Pankaja Munde & Uddhav Thackeray
दसरा मेळावा : शिवसेना-शिंदे गटातील वाद चिघळणार..सदा सरवणकरांचा BMC कडे अर्ज

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथील मैदानाच्या परवानगीसाठी या आधीच अर्ज केला आहे. मात्र अद्यापही शिवसेनेच्या अर्जाला परवानगी देण्यात आली नाही. दुसरीकडे शिंदे गटाकडून याच मागणीसाठी आज अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा अर्थात उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कवर होणार की दुसऱ्या जागी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. जर शिवसेनेला परवानगी मिळाली नाही आणि शिंदे गटाला परवानगी मिळाली तर उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी वेगळी जागा शोधावी लागू शकते. किंवा महापालिकेने वाद होऊ नये यासाठी दोघांनाही परवानगी नाकारली तर दोघांनाही दुसरे मैदान शोधावे लागू शकते आणि उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी वेगळी जागा शोधावी लागू शकते. त्यामुळे त्यांच्यावरही भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे याच्या सारखी दसरा मेळाव्यासाठी दुसरी जागा शोधावी लागणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Pankaja Munde & Uddhav Thackeray
ही शिंगावर घेणारी शिवसेना; रहिमतपूर पालिकेवर भगवा फडकणार...

दरम्यान, पंकजा मुंडे यांचा भगवानगडावर होणारा दसरा मेळावा भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री सानप यांनी विरोध केल्याने संत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेले सावरगाव या ठिकाणी घ्यावा लागत आहे. या दसरा मेळाव्याची सुरुवात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली होती. ते दरवर्षी पाथर्डी तालुक्यातील भगवानगड येथे लाखो समर्थकांना संबोधित करायचे. त्यांच्या निधनानंतर ही परंपरा पंकजा मुंडे यांनी चालू ठेवली. मात्र मठाधिपती नामदेवशास्त्रींनी यापुढे दसरा मेळावा होणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वाद निर्माण झाला होता.

यानंतर पंकजा यांनी एक वर्षे भगवानगडांच्या पायथ्याशी आपल्या समर्थकांना दसऱ्याच्या दिवशी संबोधित केलं होतं. मात्र पुढील वर्षी त्यांना भगवानबाबांची जन्मभूमीच म्हणजे भगवान भक्तीगडावर मेळावा घ्यावा लागला होता. आजही त्या तेथेच आपला दसरा मेळावा घेत असतात. यामुळे उद्धव ठाकरेंवरही शिवसेनेचा अर्थात आपले वडिल शिवसेनाप्रमुख स्वर्गिय बाळासाहेबांचा दसरा मेळावा दुसऱ्या मैदानात घेण्याची वेळ येते की काय?,असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, याबाबत महापालिका काय भूमिका घेते हे देखील पाहण महत्वाचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे हे एकमेकांना भाऊ-बहिण मानतात. ते वेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यात जिव्हाळ्याच नात कायम आहे. यातूनच त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशा चर्चाही अनेकदा रंगल्या. मात्र तुर्तास आज जी स्थीती उद्धव ठाकरेंवर आली यावरून बहिणीवर जी वेळ आली होती तशीच वेळ पंकजांचे मानलेले भाऊ अर्थात उद्धव ठाकरेंवर आली की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com