Pratik Ghule post sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh murder Case : संतोष देशमुखांच्या हत्येदिवशीच सुदर्शन घुलेच्या भावाची पोस्ट; #3333 काय आहे प्रकरण?

Santosh Deshmukh murder Case Pratik Ghule post Sudarshan Ghule : प्रतिक घुलेच्या फेसबूकच्या डीपीवर वाल्मिक कराड यांचा फोटो आहे. तर त्याने केलेल्या फोटोमध्ये सुदर्शन भैय्या घुले 3333, विरोधकांचा बाप असे हॅशटॅग वापरले आहेत.

Roshan More

Santosh Deshmukh murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी सुदर्शन घुले याला आज पोलिसांनी पुण्यातून अटक केली. सुदर्शनसह त्याचा साथीदार सुधीर सांगळेलाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी 9 डिसेंबरला सुदर्शनचा भाऊ प्रतिक घुले याची पोस्ट चर्चेत आली आली आहे.

प्रतिक घुलेच्या डीपीवर वाल्मिक कराड यांचा फोटो आहे. तर त्याने 9 डिसेंबरला केलेल्या पोस्टमध्ये 'नाव खराब केल्याने नाव संपत नस्तय भुरट्या बाप हा बापचं असतो.' असे म्हटले आहे. ही पोस्ट करत असताना प्रतिकने #सुदर्शन भैय्या घुले 3333

#विरोधकांचा बाप असे हॅशटॅग वापरले आहे. ही पोस्ट प्रतिकने सुदर्शन भैया घुले या अकाऊंटसोबत देखील शेअर केली आहे.

सुदर्श घुले याच्या अकाऊंटवरून देखील 3333 चे टॅग वापरण्यात आले आहेत. प्रतिक घुलेच्या बायोमध्ये 3333 हा ग्रुप असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख याची ज्या गाडीतून अपहरण झाले त्या गाडीचा नंबर देखील 333 असा होता.

सात जणांना अटक

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले आणि विष्णू चाटे यांचा समावेश होतो तर, संतोष देशमुख यांच्या गावातील असलेला सिद्धार्थ सोनावणे याला देखील देशमुख यांचे लोकेशन आरोपींना कळवल्यासाठी आजच अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT