
Owaisi, modi, Ajmer Sharif Dargah : उरूसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजमेर शरीफ दर्गासाठी चादर पाठवली. जी केंद्रीयमंत्री किरेन रिजिजू घेवून पोहचले. आता यावरून राजकारण होत आहे. ताज्या घटनाक्रमानुसार ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले की एकीकडे तर पंतप्रधान दर्गासाठी चादर पाठवत आहेत, तर दुसरीकडे खोदकाम करून घेत आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शायराना अंदाजात ओवेसींनी(Owasi) म्हटले की, ''“इसने हमारे जख्म का कुछ यूं किया इलाज, मरहम भी गर लगाया तो कांटे की नोंख से.'' मागील दहा वर्षांपासून भाजपचे सरकार आहे परंतु धार्मिकस्थळ कायदाबाबत भाजपची कोणतीच भूमिका नाही. तुम्ही चादर यासाठी चढवत आहात, कारण तुम्ही मानतात की तिथे दर्गा आहे. तुम्ही चादर चढवत आहात, परंतु तुमचे चाहते म्हणत आहेत की दर्गा नाही. हे थांबवलं पाहिजे.''
ओवेसींनी पुढे म्हटले की, भाजप, संघ परिवार आणि संपूर्ण देशात त्यांच्या संघटना न्यायालयात जात आहेत, की इथे-तिथे खोदकाम झालं पाहिजे. ते म्हणत आहेत की ही मशीद नाही, तो दर्गा नाही. जर पंतप्रधानांना वाटलं तर हे सगळं बंद होवू शकतं. मागील दहा वर्षांपासून भाजपचं सरकार आहे आणि नरेंद्र मोदी(PM Modi) पंतप्रधान आहेत. सात पेक्षा अधिक प्रकरणातील मशीद आणि दर्गाह तर उत्तर प्रदेशातील आहे. जिथे भाजप सत्तेत आहे आणि जिथून पंतप्रधान मोदी खासदार आहेत. चादर पाठवून काही होणार नाही, त्याचा काही संदेशही गेला पाहिजे.
केंद्रीय अल्पसंख्यांक प्रकरण मंत्री किरेन रिजिजू(Kiren Rijiju) यांनी शनिवारी सूफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या उरुसानिमित्त अजमेर दर्गावर पंतप्रधान मोदींनी पाठवलेली चादर दिली. ज्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
नोव्हेंबर 2024मध्ये अजमेरमधील एका न्यायालयाने एक याचिका स्वीकारली, ज्यामध्ये दावा केला गेला होता की, दर्गा एका शिव मंदिरावर बनवला गेला आहे आणि अजमेर शरीफ दर्गा समिती, अल्पसंख्याक प्रकरण मंत्रालय व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागास नोटीस पाठवली गेली. याचिका दाखल करणारे हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी पंतप्रधान मोदींना यंदा चादर पाठवू नये, असा आग्रह केला होता.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.