Twitter @Aaditya Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Aaditya Thackeray's Question : भूलथापा, खोट्या घोषणांच्या पलीकडे..; शेतकऱ्यांच्या बांधावरुन आदित्य ठाकरेंनी फटकारलं

Chhatrapati Sambhajinagar : गेल्यावेळीही अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. ''

अनुराधा धावडे

Chhatrapati Sambhajinagar News : ही बैठक झाली तरी मराठवाड्याला काय मिळणार आहे, गेल्या दीड वर्षांपासून भूलथापा, खोटी आश्वासने आणि खोट्या घोषणा यापलीकडे सरकारने आपल्याला काहीही दिलं नाही.उद्या मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक आहे. तीन वेगवेगळे गट एकत्र बसलेत, गद्दार गँग तिथे आहेच, पण हे खोके सरकार महाराष्ट्राला धोके देत आलय ते महाराष्ट्रासाठी का करणार हाही प्रश्न आहेच.

आमदार आदित्य ठाकरेंनी आज मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा घटनाबाह्य सरकार असे हिणवत राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्नही मांडले. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर आसूड ओढला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, ''मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे, या खर्चातून मराठवाड्याला काही मिळणार असेल तर मान्य आहे. पण ज्यांनी गोवा, गुवाहाटी, गुजरातमध्ये इतका खर्च केला. तो कुठून आला, हाही प्रश्न आहे. पण या खर्चातून मराठवाड्याला काय मिळणार आहे, या प्रश्नाचं उत्तर सरकार देणार का, घोषणा झाल्या तरी त्यावर अंमलबजावणी होणार आहे का, गेल्यावेळीही अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण आजही फिरताना असं लक्षात येत की, शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. ''

आदित्य ठाकरे म्हणाले, '२०१६ मध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अजूनही झालेली नाही. यावर आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. पण तरीही सरकार फोडाफोडीच्या मागे लागली आहे. गेल्या महिनाभरापासून मराठवाड्यात पावसाने दडी मारली होती. पण आज इथे पाऊस आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस येवोत. यासाठी आम्ही काम करत असतो. (Marathawada Politics)

आता पाऊस पडला तरी शेतीला काही उपयोग नाही.गेल्या वर्षीही दुष्काळाची परिस्थिती होती. आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. पंचनामे करण्याची मागणी केली. पण पंचनामे होऊनही मदत किती मिळाली, पुढे काय झालं, असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आजचा आणि उद्याचा दौरा हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं ऐकण्यासाठी आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सरकारसमोर मांडणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी नमुद केलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT