Rohit Pawar Nagpur Daura : 'साहेबांचा संदेश' घेऊन रोहित पवार विदर्भात; प्रफुल्ल पटेलांच्या गडालाही सुरुंग लावणार ?

NCP Crisis : रोहित पवार यांनी नुकतीच विदर्भातील नेत्यांची बैठक घेतली.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

Chandrapur News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींनी वातावरण ढवळून निघाले. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षात संघर्ष सुरु झाला. पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार गटात पदाधिकाऱ्यांसाठी रस्सीखेच सुरु आहे. अशातच शरद पवारांसाठी आता रोहित पवार स्वत: मैदानात उतरले असून ते संपूर्ण राज्यात सक्रिय झाले आहेत.

रोहित पवार यांनी नुकतीच विदर्भातील नेत्यांची नागपूरमध्ये बैठक घेतली. यावेळी पक्ष संघटना वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच चंद्रपूरच्या नेत्यांना साहेबांचा (शरद पवार यांचा) संदेशही दिला. याबरोबरच रोहित पवारांवर प्रफुल्ल पटेलांच्या गडाची अर्थात गोंदिया, भंडारा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित पवार हे लवकरच गोंदिया, भंडारा जिल्ह्यात देखील बैठका घेऊन प्रफुल्ल पटेलांच्या गडालाही सुरुंग लावण्यासाठी रणनीती आखण्याची शक्यता आहे.

Rohit Pawar
Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा ? निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला बोलावलं

अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता शरद पवार यांच्या गटाने पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यावर भर दिला आहे. यासाठी रोहित पवार स्वत: मैदानात उतरले असून ते किल्ला लढवत आहेत.

नागपूरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत त्यांच्याबरोबर आमदार संदीप क्षिरसागर, आमदार सुनील भुसारी, युवा नेते रोहित आर.आर.पाटील, सलील देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी रोहित पवारांनी चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नितीन भटारकर यांची टीम अजितदादांच्या गटाबरोबर तर राजेंद्र वैद्य व त्यांचे सहकारी शरद पवार यांच्याबरोबर आहेत. या बैठकीत रोहित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पवार साहेबांना अनेकदा असे अनुभव आले. मात्र, त्यांनी पुन्हा उभारी घेत राजकीय यश मिळविल्याची आठवण त्यांनी करून दिली.

चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उइके, सुधाकर कातकर, हिराचंद बोरकुटे, राकेश सोनानी, अरूण निमजे, कुणाल गायकवाड, अरूण वासलवार यांच्यासह चंद्रपूरमधील तब्बल दिडशे कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या यंग ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतया मल्लारप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

प्रफुल्ल पटेलांच्या गडाची जबाबदारी रोहित पवारांवर ?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यांनतर रोहित पवार अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. पक्षाने त्यांच्याकडे प्रफुल्ल पटेलांचा गड असलेल्या गोंदिया, भंडारा जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. येत्या काही दिवसांत रोहित पवार या जिल्ह्यात देखील सक्रीय होणार आहेत. त्यामुळे गोंदिया, भंडारा जिल्ह्यात आणखी राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Edited by - Ganesh Thombare

Rohit Pawar
Kolhapur Gokul Sabha: 'गोकुळ'ची सभा वादळी : मूळ सभासद गप्प; पण कार्यकर्त्यांचे आकांडतांडव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com