MLA Meghna Bordikar News Sarkarnama
मराठवाडा

MLA Meghana Bordikar On Mp Jadhav : पालकमंत्री सावंत यांच्यावर टक्केवारीचे आरोप होताच बोर्डीकर मदतीला धावल्या..

Marathwada Political News : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खासदार म्हणून तुम्ही विकासनिधी आणू शकला नाहीत.

सरकारनामा ब्युरो

Parbhani Political News : राज्याचे आरोग्यमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत सध्या त्यांच्यावर होत असलेल्या टक्केवारीच्या आरोपांनी चर्चेत आले आहेत. (Guardian Minister Tanaji Sawant) धाराशिवनंतर परभणीत देखील सावंत यांच्यावर जिल्हा नियोजन समितीतून निधी देतांना टक्केवारी घेतल्याशिवाय ते निधी वाटप करत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला होता.

सावंत (Tanaji Sawant) हे कसले पालकमंत्री, ते तर टक्केवारी घेणारे वसुली मंत्री असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला होता. जाधव यांच्या आरोपांनंतर जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर साकोरे (Meghana Bordikar) या पालकमंत्र्यांच्या मदतीला धावून आल्या आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत, त्यांनी जिल्ह्यासाठी किती विकासनिधी आणला? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना जिल्ह्यासाठी विकासनिधी आणल्याचे त्यांनी दाखवून द्यावे. उगाच खोटे आरोप करून गप्पा मारू नये, अशा शब्दात त्यांनी जाधव यांच्यावर टीका केली.

पालकमंत्री तानाजी सावंत हे भाजप आणि विरोधकांवरच निधीची खैरात करत असल्याचा गंभीर आरोप करत शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. (Sanjay Jadhav) याची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांनी मंजूर केलेली यादी रद्द करत सावंतांना जोरदार झटका दिला होता. पण त्यानंतरही सावंत यांच्यावर निधी वाटपात अन्याय होत असल्याचे आरोप केले गेले.

खासदार जाधव यांनी तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याचा राग पालकमंत्री आम्हाला निधी न देऊन काढत असल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही, तर टक्केवारी घेतल्याशिवाय सावंत निधीच देत नसल्याचा बाॅम्बगोळा देखील टाकला होता. यावर सावंत यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी मात्र या वादात उडी घेतली आहे. खासदारांनी विकासाच्या गप्पा, खोटे आरोप करू नयेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खासदार म्हणून तुम्ही विकासनिधी आणू शकला नाहीत.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना जिंतूर-गंगाखेडच्या विकासासाठी आम्हाला विकास निधी दिला गेला नव्हता. तेव्हा तुम्ही कुठे होतात? की हे सोयीस्कर विसरलात. जिंतूर- गंगाखेडला निधी मिळाल्याचा मुद्दा उपस्थितीत करत आपण आक्षेप घेतला. या भागातील मतदारांनी आपल्याला खासदार करण्यासाठी मतदान केले नाही का ? असा सवाल देखील बोर्डीकर यांनी केला. परभणी महापालिकेत आपल्या पक्षाने काय विकास केला? याचेही आत्मपरीक्षण खासदारांनी करावे. उगाच विकासाच्या गप्पा आणि खोटे आरोप करू नयेत, असा सल्लाही बोर्डीकर यांनी खासदार संजय जाधव यांना दिला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT