Chhatrapati Shivaji Maharaj Memorial News, Beed
Chhatrapati Shivaji Maharaj Memorial News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Beed News : मोदींनी भूमिपुजन केलेल्या शिवस्मारकाचे काम पुढे कधी सरकणार..

दत्ता देशमुख

Chhatrapati Shivaji Maharaj Memorial : महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेची अस्मिता व मागील २५ वर्षांहून अधिक काळापासून मागणी असलेल्या आरबी समुद्रातील शिवस्मारकाचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपुजन केले. Beed News पण, भूमिपुजनाला सहा वर्षे उलटूनही अद्याप स्मारकाची एकही विट चढलेली नाही. महायुती सरकारकडून शिवप्रेमींच्या स्मारकाबाबत अपेक्षा आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची २५ वर्षांहून अधिक काळापासूनची मागणी आहे. (Eknath Shinde) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहास व पराक्रमाची जगाला माहिती व्हावी म्हणून मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे, यासाठी विविध संघटनांनी कायम आंदोलने, पाठपुरावा केला. (Devendra Fadanvis)

महाराष्ट्राची आस्मिता असलेला हा मुद्दा दिवंगत विनायक मेटे यांनीही कायम अजेंड्यावर ठेवला. मेटेंच्या २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतील प्रवेशावेळी शिवस्मारकाची उभारणी ही प्रमुख अट वजा मागणी होती. दरम्यान, त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकारही आले. त्यामुळे आता तत्कालिन महायुती सरकारच्या काळात अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या आरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मुद्दा मार्गी लागेल या अपेक्षा उंचावल्या.

सरकारने देखील शिवस्मारक प्रकल्प अंमलबावणी व देखरेख समितीचे अध्यक्षपद मेटे यांना दिले. मंत्रीपदापेक्षा आपल्याला शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद महत्वाचे असल्याचे कायम मेटे सांगत. दरम्यान, ता. २४ डिसेंबर २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरबी समुद्रातील शिवमस्मारकाचे भूमिपुजन करण्यात आले. यानंतर स्मारक उभारणीच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची ३८२६ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करुन एका कंपनीला कामाचे कंत्राटही देण्यात आले. मात्र, स्मारकाच्या उंची व जागेवरुन वाद निर्माण झाला.

खुद्द मेटे यांनीच तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच पानी पत्र लिहून काही आरोप केले. मात्र, यानंतर काही न्यायालयीन प्रक्रीयेमुळे मागे पडलेले शिवस्मारकाचे काम पुन्हा झालेच नाही. मागच्या पावणेतीन वर्षांत राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने शिवस्मारकाच्या मुद्द्यावर एक मिनीटांचाही वेळ दिला नाही आणि एकही बैठक घेतली नाही, असा आरोप कायम मेटे करत.

आता पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्राची अस्मिता असलेला आरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीला लवकर सुरुवात होईल, अशी शिवप्रेमींची अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT