Winter Session News: शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Assembly Winter Session : १ विद्यार्थी असला तरी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी शासन म्हणून तुमच्यावर आहे.
Dipak Kesarkar
Dipak Kesarkarsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session : कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील शाळा बंद होणार असल्याची सध्या चर्चा आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर (dipak kesarkar) यांनी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले.

राज्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा, रखडलेली शिक्षक भरती, शिक्षण विभागातील रिक्त पदे, आणि शिपायांच्या रिक्त पदाच्या संख्येबाबत आज विधानसभेच्या विशेष बैठकीत चर्चा झाली. याच चर्चेत उत्तर देताना शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी 0 ते 20 पदसंख्या असलेली एकही शाळा बंद होणार नाही, असे सांगितले.

काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावरुन सरकारला टोला हाणला. "शाळा बंद होत्या म्हणून राज्यात बकरी आंदोलन झाले, पण आता बकरी, शेळ्या वळवण्याशिवाय काही राहणार नाही," असा टोला थोरातांनी लगावला. यावेळी थोरातांनी शिक्षण मंत्र्यांना शिक्षण हक्क कायद्याचा संदर्भ दिला. नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथे 43 पटसंख्या असलेली शाळा बंद करण्यात आली असल्याचा मुद्दा लक्षवेधीद्वारे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित केला.

Dipak Kesarkar
Rashmi Shukla फोन टॅप प्रकरणावरुन अजितदादा, नाना पटोले आक्रमक

थोरात म्हणाले, "राज्यघटनेत बदल करुन ते हक्क दिले आहेत. त्यामुळे 1 विद्यार्थी जरी असला तरी तिथे शाळा बांधणे दोन शिक्षकांची सोय करणे, मध्यभोजनाची सोय करणे ही सक्ती आहे. असं असतानाही सरकारकडून सर्वेक्षण केले जाते. यातून शालेय शिक्षणात गोंधळ निर्माण करतात. इगतपूरी, अमरावतीमध्ये छोटेछोटे पाडे आहेत तिथे शिक्षणाची व्यवस्था नाही. त्यामुळे १ विद्यार्थी असला तरी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी शासन म्हणून तुमच्यावर आहे. त्यामुळे स्पष्ट उत्तर द्या विचार सुरु असं उत्तर नको," .

Dipak Kesarkar
Sushant Singh Rajput Case: आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा ; त्यांचेच नाव का घेतलं जाते ? राणेंचा सवाल

" देशातील 6 वर्षेचं प्रत्येक बालक शाळेत गेलं पाहिजे, शाळेत टिकलं पाहिजे, शिकलं पाहिजे. 14 वर्षांपर्यंत शिकण्याचा अधिकार आणि हक्क त्या विद्यार्थ्याला दिला. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही पालक आणि सरकारची आहे," अशा शब्दात थोरातांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावले.

Dipak Kesarkar
Maharashtra Assembly Live : कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणार का ? ; शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले..

"५० टक्के शिक्षक भरती लवकरच केली जाणार आहे. 80 टक्के भरती करता आली असली, पण आधारकार्ड लिंकिंग सुरु असल्याने विद्यार्थ्यांची निश्चित संख्या ठरल्यानंतर 30 टक्के भरती होईल, तसेच परवानगी मिळाली तर 100 टक्के भरती करण्य़ाची तयारी शिक्षण विभागाची आहे. डिसेंबर 31 पर्यंत आधार लिंक करण्याचे काम होईल आणि त्यानंतर एक महिन्याने सर्व कामांचा मेळ घेतला जाईल, पण भरती न थांबवता 50 टक्के भरती ही ताबडतोब केली जाईल, यात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती होईल," अशी घोषणा केसरकरांनी यावेळी केली. 30 हजार प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे केसरकरांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com