MNS Loksabha News Sarkarnama
मराठवाडा

MNS On Loksabha : प्रकाश महाजनांच्या उमेदवारीने कोणाचं चांगभलं होणार ?

Marathwada Political News : सामान्यांना मनसे हाच एकमेव आधार वाटतो. पण निवडणुकीत मतदान करताना मात्र मनसेला साथ मिळत नाही.

Jagdish Pansare

Sambhajinagar Constituency News : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील काही मतदारसंघात मनसे उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून नेते बाळा नांदगावकर व इतर जण मराठवाड्यासह राज्यातील विविध मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. (Loksabha News) या बैठकांमधून काही लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून प्रकाश महाजन यांचे नाव समोर येत आहे.

दिवंगत प्रमोद महाजन यांचे भाऊ आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे मामा असलेले प्रकाश महाजन उत्तम वक्ते म्हणून ओळखले जातात. (MNS) मध्यंतरी काही काळ ते मनसेपासून दूर गेले होते, परंतु पुन्हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांनी नव्याने कामाला सुरुवात केली आहे. (Marathwada) मनसेकडे जिल्ह्यात तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी निश्चित आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जिल्ह्यात विशेषतः शहरी भागात राज ठाकरे यांचा करिश्मा दिसून आला आहे.

आजही राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा दौरा, कार्यक्रम किंवा सभा असली तर मैदान ओसंडून वाहते. राजकीय ताकद असूनही मनसेला त्याचे रूपांतर मतांमध्ये मात्र करता आले नाही, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. नेतृत्वाकडून ठोस कार्यक्रम देण्यास सातत्य नसल्यामुळे मनसेमध्ये अनेकदा मरगळ येते. मराठी पाट्या, मराठी माणसांवर अन्याय होतो तिथे सामान्यांना मनसे हाच एकमेव आधार वाटतो. पण निवडणुकीत मतदान करताना मात्र मनसेला साथ मिळत नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या गेल्या निवडणुकांवर नजर टाकली तर सत्तेत मनसेला फारसे प्रतिनिधित्वच नाही. महापालिका, जिल्हा परिषद, पंचातय समिती, नगरपरिषद अशा सगळ्याच ठिकाणी मनसेची पाटी कोरी आहे. या कोऱ्या पाटीवर हवं ते लिहिणची ताकद राज ठाकरेंमध्ये असली तरी कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वतंत्र लढण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे मर्यादा पडतात. मनसेने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगरात या संदर्भात यापूर्वी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बाळा नांदगावकर यांनी घेतला होता. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा आढावा घेत छत्रपती संभाजीनगरातून लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिंदेंची शिवसेना, एमआयएम, काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या भाऊगर्दीत आता मनसेचीही भर पडली आहे. प्रकाश महाजन या ओळखीच्या चेहऱ्याला पक्ष मैदानात उतरवणार असेल, तर मनसेला त्याचा किती फायदा होईल, यापेक्षा महाजनांच्या उमेदवारीने कोणाचे चांगभलं होणार? याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात होताना दिसते आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT