Nanded Loksabha Constituency : पुन्हा अशोक चव्हाण ? की काॅंग्रेस देणार नव्या चेहऱ्याला संधी...

Congress Political News : काँग्रेसने सूर्यकांता पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर आता मीनल पाटील खतगावकर यांच्या नावाची चर्चा आहे.
Nanded Loksabha News
Nanded Loksabha NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड लोकसभा मतदारसंघात हालचाली सुरू झाल्या आहेत. काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. (Nanded Loksabha Constituency News) वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे चव्हाण यांना फटका बसला होता. आता २०२४ मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचा उमेदवार कोण असेल? याची चर्चा सुरू झाली आहे.

Nanded Loksabha News
Pune Politics : अजितदादा पालकमंत्री झाले, तरीही चंद्रकांतदादा म्हणतात, "कायद्यान्वये सहपालकमंत्री मीच..."

दिल्ली आणि राज्यातील वरिष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) या अनुभवी नेत्याला पुन्हा मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत, पण चव्हाण यांना लोकसभेपेक्षा विधानसभेतच जास्त रस असल्याचे बोलले जाते. (Congress) त्यामुळे माजी खासदार व अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्कर पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डाॅ. मीनल खतगावकर या नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली जावी, अशा हालचाली सुरू आहेत.

पक्षाने अशोक चव्हाण यांनाच लढण्याची गळ घातली, तर मात्र मीनल पाटील यांचे नाव मागे पडू शकते. (Nanded) माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्या नावाची जोरदार चर्चा मात्र लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Marathwada) जिल्ह्यातील काॅंग्रेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मीनल पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगत आहेत, पण हे आव्हान त्यांना पेलणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. यात दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण, सूर्यकांता पाटील, ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, अशोक चव्हाण, दिवंगत नेते गंगाधरराव देशमुख कुंटूरकर या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी धक्कादायक पराभव केला होता.

पण २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेतही अशोक चव्हाण निवडून आले होते. या मतदारसंघातून काॅंग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे. उमेदवारीसाठी चर्चेत नावांपैकी डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत भास्करराव पाटील खतगावकर हे भारतीय जनता पक्षात होते. याचा मोठा फटका अशोक चव्हाण यांना निवडणुकीत बसला होता.

Nanded Loksabha News
INDIA Alliance Meeting : शरद पवार-राहुल गांधींची भेट; इंडिया आघाडीची रणनीती ठरणार

खतगावकर देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले आहेत. या मतदारसंघासह इतर काही तालुक्यांत भास्करराव पाटील खतगावकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन अशोक चव्हाण यांनी खतगावकरांशी जुळून घेत त्यांची घरवापसी केली. याचा फायदा देगलूर- बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झाला आहे.

या मतदारसंघातून काँग्रेसने सूर्यकांता पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर आता मीनल पाटील खतगावकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्या गेल्या निवडणुकीत रामतीर्थ या जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या आहेत. काॅंग्रेसच्या जिल्ह्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती दिसून येत आहे. विविध भागात आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा निवडणूक एखाद्या नवख्या उमेदवारासाठी सोपी नसते.

Nanded Loksabha News
Lok Sabha Election Survey : लोकसभेची निवडणूक आज झाली तर महाराष्ट्रात कुणाला किती जागा? सर्व्हे काय सांगतो?

पण अशोक चव्हाण आणि भास्कर पाटील खतगावकर यांचा आशीर्वाद जर मीनल पाटील यांना मिळाला, तर त्यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक सोपी ठरू शकते. अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय काॅंग्रेस हायकमांड घेणार आहे. अशोक चव्हाण यांनी लोकसभा लढवण्यास नकार दिला, तर काॅंग्रेसकडे पर्याय उपलब्ध असावा, यासाठी मीनल पाटील यांचे नाव चर्चेत आणले जात असल्याचेही बोलले जाते.

विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व‌ भाजप हा मतदारसंघ कायम राहण्यासाठी खूप मोठी शक्ती लावणार आहे. तसेच भाजपचे मिशन ४५ हे लक्ष्य आहे, ते पूर्ण करण्यासाठी नांदेडमध्ये विजय मिळणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मीनल पाटील यांना उमेदवारीचे आव्हान पेलणार का? पक्ष अनुभवी चेहऱ्याला डावलून नव्या चेहऱ्याला संधी देणार का? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com