MLA Babanrao Lonikar News Sarkarnama
मराठवाडा

Babanrao Lonikar News : बबनराव लोणीकरांची जीभ सारखी का घसरते? यापूर्वीही ओढावून घेतले वाद!

Explore why BJP MLAs frequently make controversial statements. A look into past incidents involving remarks on engineers, tehsildars, and other officials. : पस्तीस वर्ष राजकारणात आमदार, मंत्री राहिलेल्या लोणीकरांना कशाचा गर्व चढला आहे? असा सवाल आता लोक करताना दिसत आहेत.

Jagdish Pansare

BJP Political News : भाजपाचे परतूरचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी गेल्या तीन दिवसात सलग दोनवेळा वादग्रस्त विधानं करत खळबळ उडवून दिली आहे. कमी मतदान झालेल्या गावकऱ्यांनी निधी रोखण्याची धमकी दिल्याचे प्रकरण थंड होत नाही तोच काल सोशल मिडियावर टीका करणाऱ्यांवर लोणीकर भडकले. आपला राग व्यक्त करताना लोणीकर यांनी आई-बाप, बहीण, बायको अशा सगळ्यांचा उद्धार करत उद्दाम भाषा वापरली. यावरून आता लोणीकरांवर टीकेची झोड उठली आहे. लोणीकरांची जीभ सारखी का घसरते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत केला जात आहे.

पस्तीस वर्ष राजकारणात आमदार, मंत्री राहिलेल्या लोणीकरांना कशाचा गर्व चढला आहे? असा सवाल आता लोक करताना दिसत आहेत. काल तुमच्या बापाला पेरणीसीठी मोदी सहा हजार रुपये देतात, तुमच्या अंगावर, कपडे, पायात बूट याच सरकारमुळे आहे. तुमच्या मायला पेन्शन लोणीकमुळे सुरू झाली, अशा शब्दात लोणीकरांनी आगपाखड केली. (Babanrao Lonikar) लोणीकरांची जीभ घसरण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर यापुर्वी त्यांनी आमदार, सरकारी अधिकारी यांच्याविरुद्धही असभ्य भाषा वापरल्याची उदाहरणे आहेत.

महावितरणच्या अभियंत्याला दिली होती धमकी..

तीन वर्षापुर्वी संभाजीनगरच्या सातारा परिसरातील बंगल्याचे साडेतीन लाख रुपये बील न भरल्यामुळे वीज कनेक्शन कापल्याने लोणीकरांचा संताप झाला होता. महावितरणचे अभियंते दादासाहेब काळे यांना फोन करुन त्यांनी धमकावले होते. (BJP) याची आॅडिओ क्लीप व्हायरल झाली होती. तुला निलंबत करेन, ऊर्जा मंत्री माझे नातावेईक आहेत. तुझ्या प्राॅपर्टीची चौकशी करायला लावील. तुम्ही माझे मीटर काढून घेतले का? अरे नालायकांनो आम्ही बील भरतो. मी दहा लाख रुपये बील भरलं.

हिमंत आहे का तुमच्यात? झोपडपट्टीत जा जिकडे आकडे टाकतात, आम्ही पैसे भरतो. दोन मीटरचे दहा लाख भरले या वर्षात. एका मिनिटात तुला घरी पाठवील, माज चढला का? नोटीस दिली का? तीस वर्ष आमदार आहे, मी मंत्री राहिलो, नोटीस न देता आमचे मीटर काढून नेता तुम्ही. ३५ वर्ष झाले मी राजकारणात आहे. झोपडपट्टीत जा तुम्हाला सत्तूर ने तोडतील, अशी धमकी त्यांनी दिली होती.

राजेश टोपेंना शिवीगाळ..

वर्षभरापुर्वी जालना जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राहुल लोणीकर याला उपाध्यक्ष करण्याचा दिलेला शब्द न पाळल्यावरून राजेश टोपे यांना बबनराव लोणीकर यांनी शिवीगाळ केली होती. चोर, हरामखोर असे शब्द लोणीकर यांनी वापरल्याची आॅडिओ व्हायरल झाली होती. परंतु लोणीकर यांनी ही क्लीप खोटी असल्याचा दावा केला होता.

तर 2020 मध्ये फडणवीस सरकारमध्ये राज्याचे पाणिपुरवठा मंत्री असताना बबनराव लोणीकर हे मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मोर्चा काढण्यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादात सापडले होते. 'तुम्हाला वाटलं मोर्चासाठी एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू. आणि नाही जर कोणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच', त्या निवेदन घ्यायला येतील तुमचं, असं बबनराव लोणीकर म्हणाले होते. यावर स्पष्टीकरण देताना लोणीकरांच्या तोंडाला फेस आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT