Prashant Navgire Join BRS
Prashant Navgire Join BRS  Sarkarnama
मराठवाडा

Prashant Navgire Join BRS : 'बीआरएस'चा आता मनसेला जोर का झटका; राज ठाकरेंचा अत्यंत विश्वासू शिलेदार गळाला

सरकारनामा ब्यूरो

Dharashiv News : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत प्रमुख भाजप, काँग्रेससह सर्वच छोट्या मोठ्या राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच मोदी सरकारसमोर तगडं आव्हान उभं करण्यासाठी विरोधी पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.याचवेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. त्यांनी भारत राष्ट्र समिती (BRS)च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव केला आहे. त्यांनी मराठवाड्यात सभांचा धडाका लावला असून अनेक नेत्यांना गळाला लावलं आहे.

राज्यात बीआरएस पक्षाकडून एन्ट्री होताच या पक्षाने अनेक महत्वाच्या नेत्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील अनेक महत्वाचे नेते बीआरएसच्या गळाला लागले आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार अण्णासाहेब माने, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्यासह अनेक महत्वाचे नेते बीआरएसमध्ये दाखल झाले आहेत. याचवेळी बीआरएस पक्षानं राज ठाकरें(Raj Thackeray)च्या मनसेला धक्का दिला आहे.

धाराशिव मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. हा मनसेसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. प्रशांत नवगिरे (Prashant Navgire)यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे धाराशिवमध्ये मनसेत मोठी पोकळी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. नवगिरे यांनी काही काळ महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेच्या उपाध्यक्षपदाची देखील जबाबदारी सांभाळली होती.

राज्यातील राजकारण वेगवेगळ्या कारणानं तापलं असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकारणात नव्यानं एन्ट्री करणाऱ्या बीआरएस (BRS) पक्षाकडून महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा लढवण्याबाबत बीआरएस पक्षाकडून निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तसेच आगामी काळात आणखी काही नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे बीआरएस पक्ष आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

राज ठाकरेंचा विश्वासू शिलेदार गळाला...

धाराशिवमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. हा मनसे(MNS)साठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. राज ठाकरेंचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. ते गेले 28 वर्ष भारतीय विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करत आहेत.

नवगिरे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसहभारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे धाराशिवमध्ये मनसेत मोठी पोकळी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. नवगिरे यांनी काही काळ महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेच्या उपाध्यक्षपदाची देखील जबाबदारी सांभाळली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT