Anjali Damania on Ajit Pawar
Anjali Damania on Ajit PawarSarkarnama

Anjali Damania on Ajit Pawar: दिवाळीपर्यंत अजित पवार दगाफटका करणार..; अंजली दमानियांच्या दाव्याने पुन्हा खळबळ

Maharashtra Politics| शरद पवार यांनी त्यांच्या राजीनाम्यावर ठाम राहायला हवं होतं.

Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांचं बंड अजूनही शमलं नाही. ते शांत बसणार नाहीत. दिवाळीपर्यंत ते त्यांच्या आमदारांना एकत्र करुन काहीतरी मोठा दगाफटका करतील यात काही शंका नाही. येत्या काही दिवसात ते दिसून येईल. असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. (Ajit Pawar will not sit quietly..; Anjali Damania's claim )

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीत पुन्हा एकच जल्लोष पाहायला मिळाला. पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याने संभाव्य भूकंप टाळल्याचे बोलले जात आहे. पण या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. दमानिया यांनी पुन्हा एकदा या घडामोडींवर भाष्य केलं आहे. (Anjali damania)

Anjali Damania on Ajit Pawar
Bharat Gogawale News : शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; काय आहे कारण?

शरद पवार यांनी त्यांच्या राजीनाम्यावर ठाम राहायला हवं होतं. नव्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी होती. पण पवार यांनी खेळी करून बॅटही माझी आणि चेंडूही माझा हे दाखवून दिलं. पण ते शरद पवार आहेत.ते शेवटपर्यंत सत्ता सोडणार नाहीत,अशी टिका दमानिया यांनी केली. (Sharad Pawar Resign)

अजित पवार भरपूर काम करतात. पण पवार यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. अजित पवार शांत बसणार नाहीत. दिवाळीपर्यंत ते त्यांच्या आमदारांना एकत्र करुन काहीतरी मोठा दगाफटका करतील यात काही शंका नाही. येत्या काही दिवसात ते दिसून येईल. असा दावा दमानिया यांनी केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com