Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा मुद्दा २०१८ मध्ये चांगलाच पेटला होता. आरक्षणासाठीचा अद्यादेश काढावा, अशी मागणी करत कन्नड-सोयगांवचे तत्कालीन शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. (Marathwada Political News) तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दोन ओळीचा राजीनामा त्यांनी ईमेलद्वारे पाठवला होता. त्यानंतर त्याचीच प्रत जाधव यांनी विधीमंडळाच्या सचिवांकडेही प्रत्यक्ष जाऊन दिली होती.
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राजीनामा देणारे ते पहिले आमदार ठरले होते. परंतु अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनापासून हर्षवर्धन जाधव सध्या लांब आहेत. पहिल्या टप्प्यातील आंदोलनावेळी जाधव यांनी अतरंवालीत जाऊन जरांगे यांना पाठिंबा दर्शवला होता. (Marathwada) परंतु तिथेच माध्यमांशी बोलतांना त्यांनी ते करत असलेली मागणी कशी चुकीची आहे हेही सांगितले होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तर तो संसदेत घटनादुरुस्ती करूनच सोडवता येऊ शकतो.
मनोज जरांगे पाटील मागतायेत ते आरक्षण टिकणारे नाही. संसदेत कायदा करून मराठ्यांना आरक्षण मिळाले तर सर्वोच न्यायायलयही ते नाकारू शकत नाही, अशी परखड भूमिका जाधव यांनी मांडली होती. जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले, तेव्हाही हर्षवर्धन जाधव (Harshvardahan Jadhav) यांनी समाज माध्यमांतून आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत जरांगे पाटील यांची मागणी चुकीची असल्याचे सांगितले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावर जाधव यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. तेव्हापासून म्हणजे २० आॅक्टोबरपासून जाधव यांनी समाज माध्यमांवर मराठा आरक्षणच काय पण कुठल्याच विषयावर भाष्य केलेले नाही. मराठा आरक्षणासाठी आज हिंगोलीचे शिवसेना (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला. लोकसभा अध्यक्षांकडे पाटील यांनी आपला राजीनामा मेल केला असून मराठा आरक्षणासाठी आपण तो देत असल्याचे नमूद केले आहे.
या निमित्ताने हर्षवर्धन जाधव यांनी २५ जुलै २०१८ रोजी दिलेल्या आमदार पदाच्या राजीनाम्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे तेव्हा राजीनामा पाठवला होता. मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरु होते, या आंदोलनाला पाठिंबा देत हर्षवर्धन जाधव यांनी सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास आपण राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने बलिदान दिले होते. दरम्यान, मराठा आमदारांनी विधानमंडळात आरक्षणाची मागणी लावून धरावी, यासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मराठा आमदारांविरुद्ध निदर्शने केली होती.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.