Raosaheb Danve
Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve Viral Video : ए हसणारा, बिडी प्यायला आला का? दानवेंनी कार्यकर्त्यास भरसभेत झापलं

सरकारनामा ब्युरोे

Maharashtra political News : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषणातून हलके-फुलके विनोद करून उपस्थितांना पोट धरून हसायला लावतात. आज जालन्यातील एका कार्यक्रमात मात्र त्यांना संताप अनावर झाला. यावेळी दानवे एका कार्यकर्त्यावर चांगले भडकल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे कार्यक्रमाचे वातावरण गंभीर झाले होते.

जालन्यात (Jalana) प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजनेच्या माध्यमातून काही लाभार्थ्यांना कर्ज वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात दानवे (Raosaheb Danve) केंद्र सरकारच्या योजनांबाबत माहिती देत होते. तसेच लाभार्थ्यांना योजनांचे महत्वही समजावून सांगत होते.

मोदी सरकार आल्यापासून सर्व स्तरातील नागरिकांना कशा प्रकारे फायदा झाला, यबाबत दानवे माहिती देत होते. यावेळी तेथे उपस्थित कार्यकर्ता हसताना त्यांना दिसला. त्याच्या हसण्याने इतर नागरिकांना त्रास होत होता. ही बाब दानवे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी भरसभेतच हसणाऱ्यास खडे बोल सुनावले.

दानवे म्हणाले, "ए हसणारा, इथं काय बिड्या प्यायला आलास का? तू योजनेचा लाभधारक आहेस का? चल उठ येथून. बाकीच्यांना डिस्टर्ब करतोस."

दानवे भडकल्यानंतर कार्यक्रमांतील वातावरण गंभीर झाले होते. ऐरवी हसविणारे, प्रसंगावधान राखून विनोद करणारे रावसाहेब दानवे आज चांगलेच भडकल्याने नागरिकांनी पाहिले.

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) अत्यंत गंभीरपणे कोरोना काळातील स्थितीबाबत नागरिकांना माहिती देत होते. भारतात कोरोना येण्यापूर्वी जगातील इतर देशात सहा महिने आधीच कोरोनाने हाहाकार माजविला होता. पंतप्रधान मोदी यांनी सहा महिने अगोदरच देशात तयारी सुरू केल्याचे त्यांना सांगायचे होते. मात्र त्याचवेळी एक कार्यकर्त्या जोरजोरात हसत होता. हे पाहून दानवे चांगलेच संतापले. त्यावर त्यांनी क्षणही वाया न घालवता संबंधितास झापले. तसेच तेथून निघून जाण्यास सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT