Arvind Sawant News: संजय राऊतांवरील हक्कभंगाची माहिती नाही, त्यामुळे बोलणार नाही!

Shivsena : गद्दारी करून शिवसेनेला त्यांनी फसवले आहे. जनता सर्व बघत आहे.
Arvind Sawant
Arvind SawantSarkarnama
Published on
Updated on

Arvind Sawant on Sanjay Raut : उद्धव ठाकरे गटाची शिवगर्जना यात्रा विदर्भात जोरात सुरू आहे. खासदार अरविंद सावंत आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे विदर्भ पिंजून काढत आहेत. काल भंडारा जिल्ह्यात मेळावा घेतल्यानंतर अरविंद सावंत आज गोंदिया जिल्ह्यात होते. यावेळी संजय राऊतांबद्दल विचारले असता, हक्कभंगाची माहिती नाही. त्यामुळे या विषयावर बोलणार नाही, असे ते म्हणाले.

गोंदियात शिवगर्जना अभियानादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सावंत म्हणाले, आमच्या हातातून सर्व काही हिरावून घ्या. तरीही आम्ही आमची शिवगर्जना करीत राहणार आणि उभा महाराष्ट्र जागृत करत राहणार. त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळणार आहेत. गद्दारी करून शिवसेनेला त्यांनी फसवले आहे. जनता सर्व बघत आहे, शांत आहे. पण याचा उद्रेक २०२४मध्ये होणार आहे. तेव्हा गद्दारांना पळता भुई थोडी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाबाबत विचारले असता, न्यायालयाला आधी ठरवू द्या की, निकाल काय द्यायचा आहे. तो निकाल त्यांना पेलतो का ते त्यांनी बघावं आणि नंतर जी यात्रा काढायची ती काढावी. जनतेने एक ठरवलं आहे की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचे आहे. धनुष्यबाण घ्या, आणखी काही घ्या किंवा आमच्या कडून सर्व काही हिरावून घ्या. आता काहीही फरक पडणार नाही. जनता योग्य वेळ योग्य धडा त्यांना शिकवणार आहे, असे सावंत म्हणाले.

मिंधे गटाचे लोक कोणत्या स्तराला जाऊन पोहोचलेले आहेत, हेसुद्धा सर्वजण जाणून आहेत. त्यांना काहीही करू द्या, आम्ही शिवगर्जना करत जाणार आणि उभा महाराष्ट्र जोडणार. त्यांच्या शिवधनुष्य यात्रेला प्रतिसाद मिळणार नाही. कारण त्यांचा पाया बेईमानीवर रचलेला आहे. त्यांची त्यांची लोक राहतील किंवा ईडी, सीबीआयच्या धाकात असलेले लोक राहतील. तेसुद्धा मनापासून त्यांच्यासोबत असणार नाहीत. अशा शब्दांत शिंदे (Eknath Shinde) गटाच्यावतीने काढण्यात येणार असलेल्या शिवधनुष्य यात्रेवर सावंत (Arvind Sawant) यांनी प्रतिक्रिया दिला.

Arvind Sawant
Arvind Sawant : अरविंद सावंत भडकले; म्हणाले, आशिष शेलारांनी 'त्या' रात्री घेतली होती का?

अदानीच्या संदर्भात बोलताना, या प्रकरणामुळे देशाची जगभरात बदनामी झाली आहे. विदेशी कंपन्यांचे शेअर घसरत आहेत. सर्वसामान्य माणसाचे जे पैसे एलआयसीत (LIC) गुंतवलेले आहेत, त्या एलआयसीची गुंतवणूक अदानीच्या कंपनीत आहे आणि अदानी समूहाची घसरण होत आहे. हा राष्ट्रावरचा हल्ला आहे, असे अदानी कितीही म्हणत असले तरीही. हा सामान्य माणसाच्या खिशावरचा हल्ला आहे. तरीही मोदी (Narendra Modi) यावर बोलत नाहीत. परिणामी जीडीपी दर घसरला असल्याचा आरोप सावंत यांनी मोदी सरकारवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com