Aditya Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : आदित्य ठाकरेंचा संभाजीनगर दौरा, शिवसैनिकांना उर्जा देणार का ?

Will Aditya Thackeray's visit to Sambhajinagar generate energy among Shiv Sainiks? : लोकसभा निवडणुकीआधी आदित्य ठाकरे जिल्ह्यात आले होते. त्यानंतर पहिल्यादांच त्यांचा हा जिल्हा दौरा होत आहे. या दौऱ्याची तयारी आणि नियोजन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केले असून नव्यानेच त्यांची विभागीय नेते पदी निवड करण्यात आली आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काहीसी मरगळ आल्याचे चित्र आहे. राज्यात एकीकडे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले, तिथे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरमध्ये मात्र पक्षाला सलग दोन लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने जिल्ह्यातील शिवसैनिकांचे मानसिक खच्चीकरण झाल्याचे चित्र आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात नव्याने पकड मजबुत करायची असले तर शिवसैनिकांमध्ये उर्जा, उत्साह आवश्यक आहे. यासाठी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दोन दिवसांच्या संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 25 व 26 आॅगस्ट अशा दोन दिवसात आदित्य ठाकरे शहर आणि ग्रामीण भागात शिवसंकल्प मेळावे घेऊन पदाधिकारी, शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीआधी आदित्य ठाकरे जिल्ह्यात आले होते. त्यानंतर पहिल्यादांच त्यांचा हा जिल्हा दौरा होत आहे. या दौऱ्याची तयारी आणि नियोजन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केले असून नव्यानेच त्यांची विभागीय नेते पदी निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्याकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगरात पहिलाच शिवसंकल्प दौरा होत आहे. पक्ष फुटीनंतर संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश आमदार शिंदे गटासोबत गेले. (Shivsena) कन्नडचे उदयसिंह राजपूत यांचा अपवाद वगळता ठाकरे गटाला जिल्ह्यात आपली पुर्वीची ताकद निर्माण करण्यासाठी जोर लावावा लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या मानसिकतेतून शिवसैनिकांना बाहेर काढत विधानसभा निवडणुकीत पुन्हा जोरदार मुसंडी मारण्याचे मोठे शिवधनुष्य ठाकरेंच्या शिवसेनेला पेलावे लागणार आहे. यासाठी जिल्ह्यात दोन दिवसीय शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदार संघात शिवसेना पदाधिकारी व नागरिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत.

25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता सिल्लोड विधानसभा मतदार संघात, सायंकाळी 6 वाजता संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघात, तर 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पैठण, दुपारी गंगापूर - रत्नपुर, वैजापूर तर सायंकाळी 6 वाजता कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व नागरिकांशी ठाकरे संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यातून निश्चित शिवसैनिकांना उर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT