BJP will contest News Sarkarnama
मराठवाडा

BJP will contest News : हिंगोली, छत्रपती संभाजीनगर लोकसभा भाजप लढवणार ? केंद्रीय मंत्र्यांचे संकेत..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मिशन ४५ हाती घेतले आहे. काल नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर सभा घेत याची अधिकृत घोषणा केली. (BJP will contest News) महाराष्ट्र आणि मराठवाड्यात यापुर्वी शिवसेनेने लढलेल्या आणि विद्यमान खासदार असलेल्या जांगावर लक्ष केंद्रित केले आहे. संघटनात्मक बांधणीपासून लोकसभा प्रमुख नेमत भाजपने या मतदारसंघात गेल्या वर्षभरापासूनच काम सुरू केले होते.

आता लोकसभेच्या निवडणुका वर्षभरावर आलेल्या असतांना पुर्वी शिवसेनेने लढलेल्या जागांवर शतप्रतिशत (Bjp) भाजपचा उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपशी युती करून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या म्हणजेच कल्याण लोकसभा मतदारसंघापासून भाजपने आपले मिशन ४५ सुरू केल्याचे दिसून येत आहे. यावरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.

त्यातच केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभे संदर्भात देखील महत्वाचे विधान केले आहे. (Shivsena) या दोन्ही मतदारसंघांत भाजपला पोषक वातावरण आहे, असे सांगत त्यांनी या दोन्ही ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल याचे संकेत दिले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप शिंदेगटाचे विद्यमान खासदार असलेल्या मतदारसंघावर दावा सांगत आहेत.

दावा सांगून ते थांबले नाहीत, तर तिथे तयारी देखील सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या खासदारांना मात्र या विषयावर काहीच बोलायचे नाही, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीच यापुर्वी हे सांगितले होते. भाजपची तयारी आणि शिंदे गटाच्या खासदारांना काहीच बोलायचे नाही असे आदेश, यामुळे महाराष्ट्रात आणि मराठवाठ्यात पुढील काळात काय घडणार याचा अंदाज येत आहे.

नांदेडमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची सभा असतांना त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती आणि सभेत शहांकडून झालेले दुर्लक्ष यावरून शिंदे-भाजप सेनेत वाजले हे दिसत आहे. हिंगोलीमध्ये शिंदे गटाचे हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत, तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा गेल्यावेळी शिवसेनेने अवघ्या ५ हजार मतांनी गमावली होती. या दोन्ही जागा भाजपच लढवणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी तरी तसे संकेत दिले आहेत. यावर शिंदे गट काही प्रतिक्रिया देतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT