AIMIM Political News Sarkarnama
मराठवाडा

MP Imtiaz Jaleel On Loksabha : इम्तियाज जलील हिंदू व्हाेट बॅंक फोडत खैरेंना पुन्हा धक्का देणार ?

Sambhajinagar News : एमआयएमची प्रतिमा जातीयवादी, जहाल आणि भडकावू भाषण करणारा पक्ष अशी होती. ती इम्तियाज यांनी बदलण्याचा प्रयत्न केला.

Jagdish Pansare

AIMIM Political News : छत्रपती लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये धक्कादायक निकाल लागला. शिवसेनेच्या हक्काच्या मतांमध्ये मोठी फूट पडली आणि अनपेक्षितपणे एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. (Chhatrapati Sambhajinagar News) साडेचार वर्षांत `अॅक्सिडेंटल खासदार` म्हणून हिणवले गेले तरी इम्तियाज जलील यांनी आपल्या कामाची छाप मतदारांवर बऱ्यापैकी पाडली आहे.

मुस्लिम-दलितांची एकगठ्ठा मते आणि (Shivsena) शिवसेनेच्या हिंदू मतांमध्ये अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे झालेल्या विभाजनामुळे इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या रूपाने एमआयएमचा देशातला दुसरा व महाराष्ट्रातला पहिला खासदार निवडून आला. आता २०२४ मध्ये पुन्हा हिंदू व्हाेट बॅंक फोडत ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत इम्तियाज जलील आहेत.

वंचित बहुजन आघाडीसोबत नसल्याने दलित मते इम्तियाज यांच्यापासून दुरावली आहेत. याची भरपाई पुन्हा एकदा शिंदे व ठाकरे गटाचे दोन स्वतंत्र उमेदवार लोकसभेला आमने-सामने उभे ठाकणार असल्याने इम्तियाज जलील करण्याच्या प्रयत्नात आहेत. (AIMIM) हर्षवर्धन जाधव हे पुन्हा लोकसभा लढवणार असल्याने त्यांची मदतदेखील इम्तियाज यांना पुन्हा होऊ शकते.

जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीत शिवसेना-राष्ट्रवादी पक्षांमध्ये पडलेली फूट इम्तियाज यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत झालेला घोटाळा आणि यात ठेवीदारांच्या पाठीशी उभे राहून इम्तियाज जलील यांनी मोठी सहानुभूती मिळवली आहे. हे ठेवीदार शहर आणि जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या इम्तियाज यांच्या पाठीशी निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता आहे. असे झाले तर इम्तियाज यांच्यासाठी हे अॅडव्हान्टेज ठरणार आहे.

एमआयएम पक्षाची प्रतिमा जातीयवादी, जहाल आणि भडकावू भाषण करणारा पक्ष अशी होती. ती इम्तियाज जलील यांनी गेल्या साडेचार वर्षांत बदलण्याचा प्रयत्न केला. किराडपुरा दंगल प्रकरणात मंदिर वाचवण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, असंघटित कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी केलेले आंदोलन, महिला व बाल रुग्णालयासाठी उच्च न्यायालयात स्वतः वकिली करत मांडलेली बाजू आणि त्याला मिळालेले यश अशा काही गोष्टी इम्तियाज यांना लोकसभा निवडणुकीत फायदेशीर ठरणार आहेत.

विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळे इम्तियाज यांनी साडेचावर वर्षांत विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारवर कडाडून हल्ला चढवला. नुकत्याच झालेल्या शहरातील मंत्रिमंडळ बैठकीवर आदर्शच्या ठेवीदारांचा काढलेला मोर्चा आणि या मोर्चाला मंत्र्यांना समाेरे जाण्यास भाग पाडत ठोस आश्वासन मिळवण्यात इम्तियाज यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळाले. प्रत्यक्षात ठेवीदारांचे जेव्हा पैसे परत मिळायला लागतील, तेव्हा त्याचे सगळे श्रेय इम्तियाज जलील यांनाच दिले जाणार आहे. मुस्लिम खासदार असले तरी इम्तियाज जलील यांनी सर्वधर्मीयांना आपलेसे करून घेण्याचे प्रयत्न गेल्या वर्षभरापासून सुरू केले आहेत.

ते यशस्वी ठरले तर काही प्रमाणात जरी हिंदू मते त्यांच्या बाजूने वळली तर इम्तियाज यांचा दुसऱ्यांदा लोकसभा गाठण्याचा प्रवास सोपा होऊ शकतो. मुस्लिम व्हाेट बॅंक कायम राखत हिंदूंची मते मिळवण्यासाठी एमआयएमची यंत्रणा सध्या जोरात काम करते आहे. या शिवाय नव्या मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात करून घेण्याकडेही इम्तियाज व त्यांच्या पक्षाने गांभीर्याने लक्ष घातले आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक एमआयएमसाठी सोपी नसली तरी सध्या राजकीय परिस्थीतीचा फायदा हा पक्ष कसा उचलतो? यावर इम्तियाज यांचा दुसरा विजय अवलंबून आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT