Abdul Sattar-Ambadas Danve News  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena On Abdul Sattar News : सिल्लोडमध्ये मशाल पेटणार ? सत्तारांना घेरण्यासाठी ठाकरेंची सेना मैदानात...

Sillod-Soygaon : सिल्लोडमध्ये ठाकरे गटाचे सत्तारांना टक्कर देवू शकेल असे नेतृत्वच नाही.

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेकांनी सत्तारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. (Shivsena On Abdul Sattar News) अब्दुल सत्तार हे गेल्या वर्षभरापासून सातत्याने वादात अडकत आहेत.

टीईटी घोटाळा, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात केलेले वादग्रस्त विधान, वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन, अकोला येथे कृषी विभागाने टाकलेल्या धाडीवरून झालेले आरोप, कृषी महोत्सवाच्या निमित्ताने केलेल्या वसुलीचे प्रकरण ते मेडिकल काॅलेजच्या इमारतीसाठी नदीतून अवैध उपसा केल्याचा आरोप. अशी एक नव्हे अनेक प्रकरण आणि त्यावरून (Abdul Sattar) अब्दुल सत्तार हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.

विशेषत: ठाकरे गटाने सत्तार यांच्याविरोधात मोहिम उघडली आहे. (Shivsena) काॅंग्रेस, शिवसेना आणि आता शिंदे गटासोबत असलेले अब्दुल सत्तार हे पंधरा वर्षापासून सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून निवडून येतात. (Marathwada) त्यांच्या विजयाचे श्रेय भाजपच्या अदृश हाताला देखील दिले जाते. मतदारसंघावर मजबुत पकड आणि पडद्यामागची मैत्री यामुळे सत्तारांना सिल्लोडमध्ये पराभूत करणे सोपे नाही. तरी देखील ठाकरे गटाने सिल्लोडमध्ये सत्तारांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे.

शिवसेना-भाजप युती असतांना हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असल्यामुळे ठाकरे गटाने येथील संघटनेकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे सत्तारांना मतदारसंघात विरोधकच उरला नाही, ही वस्तुस्थिती आहे. ठाकरेंना धोका देवून शिंदे बरोबर गेल्याच्या सहानुभूतीचा देखील सिल्लोडमध्ये ठाकरे गटाला फायदा होण्याची फारशी शक्यता नाही. तरी देखील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिल्लोडमध्ये बैठका घेत नव्याने संघटना बांधणीचे काम हाती घेतले आहे.

भाजप सत्तारांच्या विरोधात कामय शेपूट घालत आला आहे, असा आरोप करत दानवे यांनी भाजपमधील सत्तारविरोधकांना हाताशी धरून येणाऱ्या विधानसभेचे राजकीय गणित जुळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याकाळात हा मतदारसंघ भगवामय झाला होता. आताही तो भगवामय आहे, पण त्याला शिंदे गटाची किनार आहे. सिल्लोडमध्ये ठाकरे गटाचे सत्तारांना टक्कर देवू शकेल असे नेतृ्त्वच नाही. त्यामुळे ठाकरे गटाला या मतदारसंघात शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे.

त्यात सत्तार आणि भाजपची पडद्यामगची मैत्री घट्ट असल्याने ठाकरे गटाची ताकद इथे अपुरी पडणार आहे. सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात यापुर्वी शिवसेनेने सत्तारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांच्या उमेदवाराला पंधरा हजार मते मिळाली होती. यावरून ठाकरे गटाच्या ताकदीचा अंदाज येतो. तरी देखील सत्तारांच्या विरोधात मैदानात उतरण्याची हिमंत आणि तयारी ठाकरे गटाने दाखवली हे ही नसे थोडके..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT