Ambadas Danve In Shivgarjana News : तुम्ही एक शाखा पाडाल, आम्ही दहा उभ्या करू ; दानवेंची `शिवगर्जना`..

Shivsena : शिवसेनेवर अशी कितीही संकट आली तरी त्यातून पुन्हा भरारी घेण्याचा आमचा इतिहास आहे.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada : सत्ताधारी मिंधे गटाकडून सुडाचे राजकारण सुरू आहे. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेवून हे ढोंग करत आहेत, त्याच बाळासाहेबांच्या हयातीत स्थापन झालेल्या बांद्रे येथील शिवसेनेच्या चाळीस वर्ष जुन्या शाखेवर हातोडा टाकला. (Ambadas Danve In Shivgarjana News) पण तुम्ही एक शाखा पाडाल, आम्ही दहा उभ्या करू, असा पलटवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी `शिवगर्जना`, मोहिमे दरम्यान दिला.

Ambadas Danve News
BRS Offer Pankaja Munde : मोठी बातमी ! पंकजा मुंडेंना 'बीआरएस'कडून थेट मुख्यमंत्री पदाची 'ऑफर'!

ईडीच्या कारवाया, ठाकरे कुटंबाच्या सुरक्षेत कपात आणि ज्या पक्षाने मोठं केलें, त्या पक्षाच्या फांद्या कापण्याचे काम सध्या मिंधे गटाचे खोकेबाज करत आहेत. (Shivsena) पण या राज्यातील जनता योग्य वेळी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेवर अशी कितीही संकट आली तरी त्यातून पुन्हा भरारी घेण्याचा आमचा इतिहास आहे. (Marathwada) तुम्ही एक शाखा पाडली पण शिवसैनिक दहा शाखा उभ्या करतील, असा विश्वास देखील दानवे यांनी व्यक्त केला.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात शिवगर्जना संपर्क मोहिमेच्या निमित्ताने दानवे यांनी मतदारसंघातील लोकांच्या गाठीभेठी घेतल्या. त्यांच्या समस्या ऐकून घेत उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीर उभी असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

मुंबईतील शिवसेना शाखा पाडल्याच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यातील वाघेरा या गावी शिवसेना शाखेचे उद्घाटन दानवे यांनी केला. आगामी काळात भ्रष्ट आणि हुकुमशाही गद्दारांच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेला पूर्ण ताकतीने लढायचे आहे, असे आवाहन देखील दानवे यांनी यावेळी उपस्थितांना केले. शिवसेनेची एक शाखा पाडल्याचा बदला आपल्याला आता गावोगावी नव्या शाखा निर्माण करून घ्यायचा आहे, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.